मोदी सरकार ३.० च्या पहिल्याच संसद (member of parliament) अधिवेशनचा आज दुसरा दिवस आहे. यातच लोकसभा अध्यक्षपदासाठी उद्या म्हणजेच 26 जून रोजी निवडणूक होणार आहे. यासाठी काँग्रेसने लोकसभेतील आपल्या खासदारांना सभागृहात उपस्थित राहण्यासाठी तीन ओळींचा व्हीप जारी केला आहे.
उद्या लोकसभेत महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला जाईल, असे काँग्रेस संसदीय पक्षाने खासदारांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. उद्या सभागृहात पक्षातील सर्व सदस्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. या पत्रात काँग्रेसने खासदारांना उपस्थित राहण्यासाठी वेळही सांगितली आहे. सकाळी ११ ते सभागृह तहकूब होईपर्यंत सर्व खासदारांना संसदेत उपस्थित राहणे बंधनकारक आहे, असं या पत्रात लिहिलं आहे.
दरम्यान, लोकसभा अध्यक्षांची (member of parliament) निवडणूक विनविरोध व्हावी म्हणून विरोधी पक्ष नेत्यांनी उपसभापतीपद देण्याची मागणी सत्तेतील एनडीए सरकारला केली आहे. तसेच उपसभापतीपद विरोधकांना देण्यात येईल, अशी ग्वाही भाजपने द्यावी, अशी मागणी काँग्रेसने केली आहे. मात्र भाजपने यावर अद्याप कोणतेही उत्तर दिले नाही. यानंतर आता इंडिया आघाडीच्या के. सुरेश यांनी सभापतीपदासाठी अर्ज दाखल केला.
दरम्यान, दिल्लीत आज काँग्रेस नेत्यांची बैठक पार पडली. यात महाराष्ट्रातील नेत्यांचाही समावेश आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पक्षश्रेष्ठींनी यावेळी काँग्रेस नेत्यांना सूचना दिल्या की, आगामी विधानसभा निवडणूक महाविकास आघाडी म्हणूनच आपल्याला लढायची आहे. निवडणुकीत कोणते मुद्दे घेऊन जाता येईल, यावरही बैठकीत चर्चा झाली. तसेच जाहीरनामामध्ये कोणते मुद्दे घेता येतील, यावरही बैठकीत चर्चा झाली.
आज रात्री इंडिया आघाडीच्या नेत्यांची बैठक होणार आहे. रात्री ८ वाजता ही बैठक होणार आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी ही बैठक होणार असून यात लोकसभा निवडणुकीचे मंथन करण्यात येणार आहे.
हेही वाचा :
सावधान! पश्चिम महाराष्ट्रात ऑरेंज अलर्ट तर…
इचलकरंजी येथील श्रद्धा अकॅडमीवर कारवाई करा अन्यथा उपोषण व आत्मदहनाचा इशारा! Video