भारताने टी-२० वर्ल्ड कप २०२४च्या अंतिम (cricket)फेरीत प्रवेश करत इंग्लंडला धूळ चारली आहे. २०२२ साली झालेल्या टी-२० वर्ल्ड कपमधील पराभवाचा बदला घेत, भारताने या सामन्यात प्रभावी प्रदर्शन केले.
कर्णधार रोहित शर्माने धडाकेबाज फटकेबाजी करत अर्धशतक झळकावले, ज्यामुळे भारताने प्रथम फलंदाजी करताना १७१ धावा केल्या. रोहितच्या या अर्धशतकाच्या जोरावर भारताने एक मजबूत धावसंख्या उभारली.
इंग्लंडच्या संघाने आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरले तेव्हा भारताने सुरुवातीलाच जोस बटलरला पॉवर प्लेमध्ये बाद केले, ज्यामुळे इंग्लंडला बॅकफूटवर ढकलले.
त्यानंतर कुलदीप यादवने अप्रतिम गोलंदाजी करत तीन महत्वाच्या विकेट्स घेत इंग्लंडच्या संघाचे कंबरडे मोडले. अखेरीस, भारताने इंग्लंडवर ६८ धावांनी विजय मिळवला आणि अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश केला.हा विजय भारतीय संघासाठी मोठा आत्मविश्वास वाढवणारा आहे आणि अंतिम सामन्यासाठी ते सज्ज झाले आहेत
जोरदार पावसाच्या तडाख्यानंतर रोहित शर्माने धावांचा पाऊस पाडल्याचे पाहायला मिळाले. भारतीय कर्णधाराने इंग्लंडविरुद्ध धडाकेबाज खेळी करत सलग दुसरे अर्धशतक झळकावले. मात्र, विराट कोहली यावेळी फक्त ९ धावांवर बाद झाला, आणि ऋषभ पंतला फक्त चार धावांवर समाधान मानावे लागले.
दोन विकेट्स झटपट पडल्यामुळे भारतीय संघ दडपणाखाली आला होता, परंतु रोहित शर्माने सूर्यकुमार यादवच्या साथीने तिसऱ्या विकेटसाठी ७३ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचली. रोहितने सहा चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर ५७ धावांची खेळी साकारली.
रोहित शर्माने शतकाच्या दिशेने कूच करत असतानाच रशिद खानने त्याला क्नी बोल्ड करून भारताला मोठा धक्का दिला. रोहित बाद झाल्यावर सूर्यकुमार यादव दमदार फलंदाजी करत होता आणि अर्धशतकाच्या दिशेने मार्गक्रमण करत होता.
भारतीय संघाची ही खेळी इंग्लंडविरुद्ध विजयासाठी निर्णायक ठरली आणि त्यांनी अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश केला.
हेही वाचा :
पुण्यात झिकाचा तिसरा रुग्ण आढळला, एरंडवणे परिसरात चिंतेचे वातावरण
इंग्लंड विरुद्ध भारत सामन्याआधी पावसाची हजेरी; सामना रद्द झाल्यास कोणाला फायदा?
‘सरफिरा’ च्या दुसऱ्या गाण्यात राधिका मदानसह अक्षयचा रोमॅंटीक अंदाज