नेटफ्लिक्स(netflix) भारतासह जगभरात कोट्यवधी लोकांच्या पसंतीस उतरलेले आहे. आता नेटफ्लिक्स भारतात मोफत मनोरंजनाचा पर्याय आणणार का? असा सवाल सध्या सगळ्यांच्या मनात आहे. याबाबत अजून कोणतीही अधिकृत घोषणा झाली नसली तरी, परदेशात नेटफ्लिक्स मोफत अॅड-सपोर्टेड प्लॅन आणण्याच्या विचारात असल्याची चर्चा आहे.
भारतात अनेक ओटीटी प्लॅटफॉर्म मोफत मनोरंजन देतात पण त्याबदल्यात जाहिराती पाहाव्या लागतात. नेटफ्लिक्स(netflix) मात्र आतापर्यंत फक्त सब्सक्रिप्शनवरच चालत आला आहे. पण वाढती स्पर्धा आणि सब्सक्रायबर्सच्या वाढीमध्ये थोडी स्थिरता लक्षात घेऊन आता ते ही फ्री अॅड-सपोर्टेड प्लॅन आणण्याचा विचार करत आहेत.
याचा भारतात फायदा होऊ शकतो कारण इथे नेटफ्लिक्स सब्सक्रिप्शन plans आधीपासूनच अगदी कमी दरात उपलब्ध आहेत. बेसिक मोबाइल प्लॅन फक्त ₹१४९ इतका स्वस्त आहे. पण मोफत पर्याय आल्यास नेटफ्लिक्सवर अधिकाधिक प्रेक्षक येऊ शकतात. याचा फायदा म्हणजे जाहिरातींच्या माध्यमातून नेटफ्लिक्सलाही अतिरिक्त उत्पन्न मिळेल.
अजून याबाबतची कोणतीही घोषणा झालेली नसली तरी, भारतामध्ये netflixची लोकप्रियता पाहता नेटफ्लिक्स जर भारतात मोफत अॅड-सपोर्टेड प्लॅन आणला तर मात्र तो इथल्या प्रेक्षकांसाठी खूप आकर्षक ठरेल यात शंका नाही
हेही वाचा :
मनोज जरांगे यांच्या मातोरी गावात गुरुवारी संध्याकाळी दगडफेक झाल्याची घटना,अनेक गाड्यांचे नुकसान
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची आणीबाणीविषयी आक्रामक टिप्पणी, संसदेत चर्चा सुरू
लक्ष्मण हाके आणि आबासाहेब वाघमारे यांची अभिवादन यात्रा स्थगित, पुन्हा सुरुवात तारखेला