कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीला(budget) मोठ्या अपयशाला सामोरे जावे लागल्यानंतर, सावध झालेल्या सरकारने शुक्रवारी विधिमंडळ अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. अर्थमंत्री अजितदादा पवार यांचा हा अर्थ संकल्प म्हणजे विधानसभा निवडणुकांसाठी मतांची पेरणी करणारा आहे. सबका विकास हा मूलमंत्र या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून सांगितला गेला आहे. अपेक्षेप्रमाणे विरोधकांच्याकडून हा अर्थसंकल्प म्हणजे लबाडा घरचे निमंत्रण असल्याची टीका करण्यात आली आहे.
दुधाने तोंड भाजले की ताक सुद्धा थुंकून प्यावे लागते अशी गत सत्ताधारी महायुतीची(budget) झालेली आहे. लोकसभा निवडणुकीत महायुतीला अगदी अनपेक्षित पणे मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. विधानसभा निवडणुकीत पराभवाची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी अर्थसंकल्प सादर करताना पुरेपूर खबरदारी घेतलेली दिसते. सर्वच घटकांना खुश करण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे.
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हा थापांचा अर्थसंकल्प असल्याची टीका केली आहे तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा अर्थसंकल्प थापांचा नव्हे तर मायबापांचा असल्याचे म्हटले आहे. कोणत्याही सरकारने वार्षिक अर्थसंकल्प सादर केल्यानंतर त्याच्यावर उलट सुलट चर्चा ही नेहमीच होत असते. विरोधक टीका करत असतात तर सत्ताधारी कौतुक करत असतात.
शेतकरी, दूध उत्पादक, युवक, महिला या सर्वांच्या साठी या अर्थसंकल्पात काही ना काही तरी दिले गेले आहे.
विशेषता शेतकऱ्यांच्यासाठी भरपूर काही या अर्थसंकल्पात आहे. गाव तेथे गोदाम या योजनेअंतर्गत शंभर गोदामे बांधली जाणार आहेत आणि त्यासाठी भरीव आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. वास्तविक शेतकऱ्यांचा नाशवंत कृषी माल हा टिकवून ठेवण्यासाठी कोल्ड स्टोरेज उभारणे अपेक्षित आहे. किमान तालुक्याला एक असे कॉलर स्टोरेज दिले तरी शेतकऱ्यांना त्याचा मोठा फायदा होणार आहे. पण त्यासाठी कोणतीही तरतूद या अर्थसंकल्पात करण्यात आलेली नाही.
कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील महापूराचे पाणी दुष्काळग्रस्त भागाकडे वळवण्याचा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प जागतिक बँकेच्या सहकार्याने राबवला जाणार आहे. 3200 कोटी रुपयांचा हा प्रकल्प कोल्हापूर सांगली जिल्ह्यातील पूरस्थितीवर नियंत्रण मिळवणार आहे. या प्रकल्पाची गेल्या तीन-चार वर्षांपासून फक्त चर्चाच होते आहे. आता मात्र जागतिक बँकेच्या सहकार्यातून हा प्रकल्प राबवण्याचा विचार अर्थमंत्र्यांनी बोलून दाखवला आहे.
राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना गाईच्या दुधावर (budget)प्रति लिटर पाच रुपये अनुदान दिले जाणार असल्याची घोषणा या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. कांदा उत्पादकांच्या साठी आत्तापर्यंत 851 कोटी 66 लाख रुपयांचे अनुदान देण्यात आले असून गेल्या तीन वर्षात शेतकऱ्यांच्या विकासासाठी 15000 कोटी रुपये खर्च करण्यात आले असल्याचे या अर्थसंकल्पात म्हटले आहे. नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेअंतर्गत 21 जिल्ह्यात सहा हजार कोटी रुपये खर्च करून एक वेगळी योजना दुसऱ्या टप्प्यात राबवली जाणार आहे.
अजितदादा पवार यांनी मांडलेल्या अंतिम अर्थसंकल्पावर आगामी विधानसभा निवडणुकीचा प्रभाव आहे. या निवडणुका जिंकण्यासाठी सर्व स्तरातील मतदारांना खुश करण्याचा प्रयत्न त्यांनी या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून केला आहे. म्हणूनच हा अर्थसंकल्प मतांची पेरणी करणारा आहे असे म्हटले तर वावगे ठरू नये.
विधानसभा निवडणुका समोर ठेवून या अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस पडेल असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते. आता त्यांनी हा अर्थसंकल्प थापांचा असल्याचे म्हटले आहे. तर लबाडा घरचे निमंत्रण, प्रत्यक्ष जेवल्याशिवाय खरे नाही असा स्वर विरोधी पक्षांनी लावला आहे. गेल्या काही महिन्यांपासून कृत्रिम बुद्धिमत्तेची सर्वत्र चर्चा सुरू आहे. आता शेतीसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्यासाठी या अर्थसंकल्पात 100 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे याशिवाय राज्यातील 108 सिंचन प्रकल्पांना सुधारित मान्यता दिली गेली आहे. मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे या तीन महानगरात पेट्रोल 65 पैशांनी तर डिझेल दोन रुपये सात पैशांनी स्वस्त होणार आहे. त्यासाठी या अर्थसंकल्पात मूल्यवर्धित कर 24 टक्क्यावरून 21% वर आणला आहे.
लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीकडून वाढत्या महागाईवर(budget) भरपूर चर्चा करण्यात आली होती. सामान्य माणसाची जगण्याची लढाई किती बिकट बनत चालली आहे यावर इंडिया आघाडीच्या नेत्यांनी प्रचार सभेत बोट ठेवले होते. अजित दादा पवार यांनी वाढत्या महागाईला लगाम घालण्यासाठी कोणत्याही उपाययोजना केलेल्या नाहीत असे दिसते. त्यांनी किमान इंधनावरील मूल्यवर्धित कर दहा टक्क्यापर्यंत खाली आणला असता तर पेट्रोल आणि डिझेल स्वस्त झाले असते आणि महागाई सुद्धा कमी झाली असती. प्रत्यक्षात सामान्य माणसाला महागाईच्या झळा कमी करण्यासाठी कोणत्याही प्रकारचा दिलासा दिला आहे असे या अर्थसंकल्पातून स्पष्ट होत नाही. सर्वसामान्य जनतेला अर्थसंकल्पाबद्दल फारशी माहिती नसते. नुसतेच अब्जावधी रुपयांचे आकडे बघून तो चक्राऊन जात असतो. महागाई किती कमी होणार हाच त्याच्या मनामध्ये विचार असतो.
हेही वाचा :
“आता कल्ला तर होणारच, पण…” ‘Bigg Boss Marathi 5’चा जबरदस्त प्रोमो प्रदर्शित
नोकरीची सुवर्णसंधी! कोणत्याही परीक्षेशिवाय मिळणार सरकारी नोकरी
बिन चेहऱ्याची निवडणूक नको संजय राउतांनी टाकली ठिणगी