मुंबई : ‘बिग बॉस’ म्हणजे मनोरंजनाचा बादशाह असलेला छोट्या पडद्यावरील वादग्रस्त(promo) पण तितकाच लोकप्रिय कार्यक्रम. बिग बॉस मराठीचा नवा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘कलर्स मराठी’ आणि जिओ सिनेमाच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर ‘बिग बॉस मराठी’च्या नव्या सीझनची घोषणा करण्यात आली आहे.
काही दिवसांपूर्वीच ‘बिग बॉस मराठी’चा धमाकेदार प्रोमो(promo) प्रेक्षकांच्या भेटीला आला. या प्रोमोवरुन रितेश भाऊमुळे ‘बिग बॉस’ आणखी ग्रँड होणार असल्याचं स्पष्ट झालं. अशातच आता पुन्हा एकदा नव्या पर्वाचा नवा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. हिंदी-मराठी मनोरंजनसृष्टी गाजवणारा संपूर्ण महाराष्ट्राचा लाडका सुपरस्टार रितेश देशमुख यंदाचा सीझन वाजवायला सज्ज आहे. त्यामुळे अफलातून धमाल आणि कल्ला तर होणारच ना भाऊ.
आता पुन्हा एकदा नव्या पर्वाचा नवा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. आता बिग बॅासच्या किचनमध्ये भांड्याला भांडं लागणार… आणि रितेश देशमुखच्या स्टाईलने सिझन गाजणार…, असं म्हणत ‘बिग बॉस मराठी’च्या तिसऱ्या सिझनचा प्रोमो कलर्स मराठीकडून शेअर करण्यात आला आहे. हिंदी- मराठी मनोरंजनसृष्टी गाजवणारा संपूर्ण महाराष्ट्राचा लाडका सुपरस्टार रितेश देशमुख यंदाचा सीझन वाजवायला सज्ज आहे.
‘बिग बॉस मराठी’ च्या पहिल्या प्रोमोमध्ये रितेश भाऊची ‘लयभारी’ स्टाईल पाहायला मिळाली. अन् आता नव्या प्रोमोमध्येही त्याचा कमाल स्वॅग पाहायला मिळत आहे. ‘बिग बॉस’च्या घरात आतापर्यंत ज्या पद्धतीने गेम प्लॅन, टास्क स्पर्धक खेळले. त्याप्रकारे या पर्वातील स्पर्धकांना खेळता येणार नाही. कारण स्पर्धकांचे प्लॅन तोडायला रितेश भाऊ सज्ज आहे. ‘तंटा नाय तर घंटा नाय… ते प्लॅन बनवणार आणि मी तोडणार.. कारण आता मी आलोय कल्ला तर होणारच… तो पण माझ्या स्टाईलने, असं या प्रोमो रितेश देशमुख म्हणताना दिसत आहे.
महाराष्ट्रात लवकरच ‘बिग बॉस’ चा आवाज घुमणार आहे. आगळावेगळा भन्नाट रिअॅलिटी शो म्हणून ”बिग बॉस’कडे पाहिलं जातं. हा कार्यक्रम जेवढा मनोरंजक आहे. तेवढाच आव्हानात्मक आहे. या पर्वातही एकापेक्षा एक अतरंगी स्पर्धक अशक्य, अफलातून गोष्टी करताना दिसून येतील. तसेच रितेश देशमुख आपल्या अनोख्या अंदाजात पाहायला मिळणार आहे. ‘बिग बॉस’ मराठीचा नवा सीझन प्रेक्षकांना लवकरच कलर्स मराठी आणि जिओ सिनेमावर पाहता येईल.
हेही वाचा :
एकतर्फी प्रेमातून 23 वर्षीय तरुणीवर कैचीने सपासप वार
एक टोमॅटोची जादू, ५ मिनिटांत तयार होईल कुरकुरीत टोमॅटो डोसा
राज ठाकरे यांच्या आपत्तीत, मुख्यमंत्री मोदींना कडे सरकारी उपक्रमांची वधीलेली मागणी!