आषाढी एकादशीच्या दिवशी चुकूनही ‘या’ गोष्टी करू नका; होइल मोठं नुकसान

आषाढी एकादशी म्हणजेच देवशयनी एकादशी. विविध ठिकाणी या एकादशीला(astology) वेगवेगळ्या नावांनी ओळखलं जातं. या दिवशी सर्वच भक्त श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांची पूजा करतात. देवाकडून सुख, शांती आणि समृद्धीचा आशिर्वाद मिळावा यासाठी या दिवशी मोठी पुजा केली जाते. यंदा आषाढी एकादशी १७ जुलै रोजी आली आहे.

आषाढी एकादशीला घरात प्रत्येक व्यक्तीचा उपवास असतो. हे एक पवित्र व्रत असल्याचं मानलं जातं. आषाढी एकादशीला अध्यात्मीक आणि धार्मिक महत्व आहे. सुखी आयुष्यासाठी या दिवशी कडक उपवास केला जातो आणि देवाची मनोभावे आराधना केली जाते. आषाढी एकादशीला काही गोष्टी चुकूनही आपल्या हातून घडू देऊ नका.

एकादशीला काय करावे आणि काय करू नये?

मंत्र जप
देवाची मनोभावे पुजा करताना त्यासोबत आषाढी एकादशीच्या दिवशी सतत देवाच्या नावाचे नामस्मरण करत राहा. त्याने सुद्धा तुमच्या जीवनात सुख, शांती आणि समृद्धी नांदत राहिल.

तुळशीची पाने
आषाढी एकादशीच्या दिवशी चुकूनही तुळशीची पाने तोडू नका(astology). कारण या दिवशी तुलसी देवी श्री हरीसाठी उपवास करते. त्यामुळे पुजेसाठी या दिवशी तुम्हाला तुळशीची पाने लागत असतील तर आदल्या दिवशीच ती तोडून ठेवा.

तांदळाचे सेवन
ज्या व्यक्तीचा उपवास आहे त्यांनी उपवासाच्या पदार्थात तांदळाचे सेवन करू नये. काही व्यक्ती तांदळाच्या पापड्या किंवा त्याची पेज खातात. मात्र आषाढी एकादशीला हा आहार चुकीचा आहे.

तामसीक आहार
ज्या व्यक्ती आषाढी एकादशीचा उपवास पकडतात त्यांच्या मनात आदल्या दिवशीच जास्त जेवण करावं असे विचार येतात. मात्र अशा पद्धतीने तामसीक आहार म्हणजे तेलकट, तिखट, मांस असा आहार करणे चूक आहे. त्याने आरोग्यासह तुमच्या खिशावर सुद्धा वाईट परिणाम झालेला दिसेल.

टीप : ही सामान्य माहिती आहे. आषाढी एकादशीबाबत आम्ही कोणताही दावा करत नाही.

हेही वाचा :

‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेचा पहिला ‘हफ्ता’ मिळणार ‘या’ दिवशी

गोरगरीबांसाठी IGM हॉस्पिटलला उत्कृष्ट सेवा मिळवून देण्यासाठी अतोनात प्रयत्न व चप्पल न घालण्याची शपथ

‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजना; मंत्री हसन मुश्रीफांनी कोल्हापूरच्या लाडक्या आया बहिणींना दिली महत्त्वाची माहिती