काँग्रेस आमदार धीरज देशमुख यांनी विधानपरिषद (legislative) निवडणुकीबाबत विश्वास व्यक्त करताना म्हटलं की, “विधानपरिषदेचीही शेवटी निवडणूक आहे, निवडणूक लढली पाहिजे. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी लढली आणि यश मिळालं. आम्हाला विश्वास आहे की, तसाच निकाल विधानपरिषद निवडणुकीतही लागेल. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठीची ही पार्श्वभूमी ठरेल.” एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी महाविकास आघाडीचा विजय होईल असं ठणकावून सांगितलं.
नॅशनल बँकेत खातं उघडायचं असेल तर महिलांना अडचणी येतात
धीरज देशमुख यांनी सरकारच्या लाडकी बहीण योजनेतील अटींबद्दल टीका केली आहे. त्यांनी सांगितलं, “लाडकी बहीण योजना सरकारने (legislative)आणली, त्यामध्ये एक अट ठेवली होती की, बँकेत अकाऊंट असले पाहिजे. आपण या योजनेचा अभ्यास केला तर लक्षात येईल ही फार गरीब वर्गासाठी आणलेली योजना आहे. नॅशनल बँकेत खातं उघडायचं असेल तर महिलांना अडचणी येतात.” त्यांनी ही योजना लागू करण्याच्या प्रक्रियेतील अडचणींबद्दलही भाष्य केलं.
मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर सभागृहात चर्चा व्हायला हवी
धीरज देशमुख यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर अधिवेशनात (legislative) चर्चा होण्याची गरज व्यक्त केली. त्यांनी सांगितलं, “मनोज जरांगेंची प्रत्येक जिल्ह्यामध्ये शांतता रॅली सुरु आहे. सरकारने त्यांना सांगितलंय की, 13 जुलैपर्यंत याबाबतचा निर्णय घेणार आहोत. त्यामुळे जी चर्चा होणे अपेक्षित आहे, ती अधिवेशनात होणे अपेक्षित आहे. सह्याद्री अतिथी गृहामध्ये चर्चा करुन उपयोग नाही. याबाबत सभागृहात एकदिवसीय चर्चा व्हायला हवी.”
विधान परिषदेच्या 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात
विधान परिषदेच्या 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात आहेत, त्यामुळे मतांची फाटाफूट होण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं की, प्रत्येक पक्ष आपली व्यवस्था करत आहे. महायुतीकडे 200 आमदार आहेत तर महाविकास आघाडीकडे 65 आमदार आहेत. NCP ला 4 तर ठाकरे गटाला 8 मतांची गरज आहे. भाजपला आपले 4 उमेदवार स्वबळावर निवडून आणता येऊ शकतात.
हेही वाचा :
मराठमोळ्या ऋतुराजचं अतुफानी फलंदाजी; टीम इंडियाचं झिम्बाब्वेसमोर 183 धावांचे आव्हान..
रिल्स बनवण्याच्या नादात दोन विद्यार्थी ठार
नदीच्या प्रवाहाशी झुंज! तरुणाच्या शोधार्थ जीवघेण्या 48 तासांची शोधमोहीम