शिवसेना ठाकरे गटाचा मास्टर प्लान…

विधान परिषदेच्या ११ जागांसाठी आज सकाळी ९ वाजेपासून मतदानाला(political) सुरुवात होणार आहे. एकूण १२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असल्याने ही निवडणूक अत्यंत चुरशीची होणार आहे. त्यामुळे महाविकास आघाडी की महायुतीत? कोणाचा उमेदवार पडणार, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून आहे. दरम्यान, मिलिंद नार्वेकर यांनी निवडून आणण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाने खास प्लान आखला आहे.

मिलिंद नार्वेकरांना सुरक्षित करण्यासाठी शिवसेना (political)ठाकरे गटाने खास रणनिती आखली आहे. त्यांनी मित्रपक्षांकडून मतांची जुळवाजुळव सुरू केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेसचे आमदार प्रथम प्राधान्य काँग्रेस उमेदवार प्रज्ञा सातव यांना देणार आहे. त्यानंतर द्वितीय प्राधान्य हे मिलिंद नार्वेकरांना दिले जाणार आहे.

या निवडणुकीत एक उमेदवार विजयी होण्यासाठी 23 मतांचा कोटा ठरला आहे. अशात ठाकरेंच्या शिवसेनेकडे फक्त 15 आणि 1 अपक्ष अशी 16 मते आहेत. अशा परिस्थितीत नार्वेकर यांना निवडून येण्यासाठी आणखी 7 मतांची गरज आहे.

दुसरीकडे काँग्रेसकडे 37 मते असून त्यांनी ते त्यांची 27 ते 30 मते प्रज्ञा सातव यांना देणार आहेत. प्रज्ञा सातव यांना मतांचा कोटा दिल्यानंतर 7 ते 10 मते काँग्रेसकडे शिल्लक राहतात ही मते काँग्रेस नार्वेकरांना देणार आहे.

दरम्यान काँग्रेसची एकूण मते 37 मते असली तरी या निवडणुकीत काँग्रसची 3 ते 4 मतं फुटणार असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. जर ही 4 मते फुटली तर काँग्रेसकडे 33 मते शिल्लक राहतात. त्यामुळे प्रज्ञा सातव यांना काँग्रेस ज्येष्ठ आणि विश्वासू आमदारांचा 27-30 मतांचा कोटा प्रज्ञा सातव यांना देणार आहे. यामुळे प्रज्ञा सातव यांचा मतांचा कोटा वाया जाणार नाही.

यावेळी हा गट मिलिंद नार्वेकर यांना द्वितीय प्राधान्य ठेवणार. त्यामुळे जर कोणतीही चूक न होता प्रज्ञा सातव यांचा निर्णायक 23 मतांचा कोटा पूर्ण झाल्यानंतर 4-7 मते शिल्लक राहतात. याशिवाय उर्वरित जी 7 ते 10 मते शिल्लक आहेत ती देखील नार्वेकरांना मिळतील. त्यामुळे नार्वेकरांचा विजय सुकर होईल.

हेही वाचा :

शिर्डी दर्शनासाठी रेल्वेची खास ऑफर: अवघ्या 6 हजारात संपूर्ण यात्रा सुविधा!

सांगली: प्रतापसिंह उद्यानात पक्ष्यांचे विश्व उलगडणारे पक्षी संग्रहालय लवकरच खुले होणार

पेपर लीक प्रकरण: व्हायरल स्क्रीनशॉट प्रकरणी विद्यार्थ्यावर गुन्हा दाखल