इचलकरंजीला स्वतंत्र जिल्हा किंवा तालुका करण्यासाठी हाळवणकर आणि आवाडे यांच्यात तीव्र संघर्ष

इचलकरंजी: मँचेस्टर(manchester) नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इचलकरंजी शहराचे औद्योगिक क्षेत्र वाढत असले तरी, केंद्र व राज्य सरकारकडून आवश्यक निधी मिळत नसल्यामुळे शहराची अधोगती होत आहे. या पार्श्वभूमीवर, माजी आमदार सुरेश हाळवणकर आणि आमदार प्रकाश आवाडे यांनी इचलकरंजीला स्वतंत्र जिल्हा किंवा तालुका करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

माजी आमदार सुरेश हाळवणकर यांनी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे इचलकरंजी(manchester) स्वतंत्र जिल्हा व्हावा यासाठी पत्र व्यवहार सुरू केला आहे. तर आमदार प्रकाश आवाडे यांनी विधानसभेत इचलकरंजीला स्वतंत्र तालुका करण्याची मागणी केली आहे.

आजी-माजी आमदारांमध्ये यासाठी तीव्र संघर्ष पाहायला मिळत आहे. दोघेही महायुतीमध्ये काम करत असून, येणाऱ्या विधानसभेसाठी जोरदार तयारी सुरू आहे. आमदार प्रकाश आवाडे अपक्ष म्हणून उभे राहणार का, भाजपमधून राहणार की माजी आमदार सुरेश हाळवणकर यांना भाजपचे तिकीट मिळणार याबाबत सस्पेंस आहे. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे विधानसभेची जोरदार तयारी सुरू असल्याने, इचलकरंजी जिल्हा की तालुका करण्यासाठी दोघांनीही जीवाची बाजी लावली आहे.

हेही वाचा :

आज ‘या’ राशीच्या लोकांचं नशीब फळफळणार, पैसा अन् सन्मान भरभरून मिळणार

WhatsApp ने रोलआउट केला नवीन तगडा फिचर!

कोल्हापूरच्या शेतकरीपुत्राची सीए परीक्षेत घवघवीत यश मिळवत झेप