भारतीय क्रिकेट संघाला आयसीसी टी-२० वर्ल्डकप जिंकून देणारा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma)सध्या लंडनमध्ये आहे. १२ जुलै रोजी विम्बल्डन पाहण्यासाठी त्याने हजेरी लावली. एकीकडे लंडनमध्ये विम्बल्डन स्पर्धेचा थरार सुरू असताना, मुंबईत अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाची धामधूम सुरू आहे. मात्र मुंबईच्या राजाने अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा लग्नसोहळा सोडून लंडनला जाण्याला पसंती दिल्याचे पाहायला मिळाले आहे. रोहितचा हटके लुकचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.
अमेरिका आणि वेस्टइंडिजमध्ये आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेचा(Rohit Sharma) थरार पार पडला. या स्पर्धेतील फायनलमध्ये भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेला पराभूत केलं आणि ट्रॉफी उंचावली. दरम्यान, वर्ल्डकप विजेत्या रोहित शर्मावर कौतुकाचा वर्षाव केला जातोय. विम्बल्डनमध्येही त्याने शानदार एन्ट्री केली. हा व्हिडिओ विम्बल्डनच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. दरम्यान या व्हिडिओवर कॅप्शन म्हणून, ‘वेलकम टू विम्बल्डन रोहित शर्मा’, असं लिहिण्यात आलं आहे.
रोहित शर्माच्या लुकची सर्वत्र चर्चा होत आहे. सूट बूट आणि काळ्या रंगाचा चष्मा घालून त्याने विम्बल्डनच्या कोर्टवर शानदार एन्ट्री केली. सोशल मीडियावर त्याच्या या हटके स्टाईलची जोरदार चर्चा सुरू आहे.
रोहित शर्मासह अनेक दिग्गज मंडळींनी विम्बल्डन पाहण्यासाठी हजेरी लावली होती. स्पर्धेतील सेमिफायनलचा सामना पाहण्यासाठी दिनेश कार्तिकसह त्याची पत्नी दीपिका पल्लेकलने देखील हजेरी लावली. अनेक दिग्गज क्रिकेटपटूंनी अनंत अंबानीच्या लग्नाला जाणं पसंत केलं. मात्र रोहित आणि दिनेश कार्तिकने विम्बल्डन पाहण्यास पसंती दिली आहे. यापूर्वी सचिन तेंडुलकरने देखील ही स्पर्धा पाहण्याासाठी हजेरी लावली होती.
हेही वाचा :
‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत’ 5 मोठे बदल; अधिसूचना निघाली
“पुन्हा आमचे सरकार येणार नाही,” भाजप आमदाराच्या व्हायरल व्हिडिओमुळे खळबळ
आमदारांना शेअर मार्केटसारखा भाव, कुणाला २५ कोटी, तर… ; संजय राऊतांचा आरोप