कोल्हापूर, १३ जुलै २०२४ – लंडनमधील व्हिक्टोरिया अॅन्ड अल्बर्ट म्युझियममधून(protest) भारतात आणली जाणारी वाघनखं छत्रपती शिवाजी महाराजांची नसल्याचा दावा इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांनी केला आहे. त्यांच्या या दाव्यानंतर कोल्हापुरात आंदोलनाची लाट उसळली असून, बिंदू चौकात सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या विरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे(protest) गटाच्या वतीने झालेल्या या आंदोलनात मंत्री मुनगंटीवार यांनी वाघनख्यांसंदर्भात सभागृहात खोटी माहिती दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. आंदोलनकर्त्यांनी आरोप केला की, मंत्री मुनगंटीवार खोटी वाघनखं महाराष्ट्रात आणून शिवप्रेमींची दिशाभूल करत आहेत.
आंदोलनाच्या ठिकाणी प्रतिकात्मक वाघनखं ठेवून आणि सुधीर मुनगंटीवार यांच्या फोटोला फुल्या मारून निषेध व्यक्त करण्यात आला. शिवसेनेचे उपनेते संजय पवार यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले असून, त्यांनी इशारा दिला की, जर ही खोटी वाघनखं कोल्हापुरात प्रदर्शनाला ठेवली गेली, तर मोठा संघर्ष निर्माण होईल.
इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांनी म्युझियमकडून पत्र मिळाल्याचे सांगितले असून, यामुळे शासनातील संबंधित मंत्री आणि अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने याप्रकरणी अधिकृत निवेदन जारी करण्यात येईल, अशी माहिती संजय पवार यांनी दिली.
हे आंदोलन कोल्हापूरच्या ऐतिहासिक बिंदू चौकात पार पडले असून, या मुद्द्यावर राज्यभरात चर्चा सुरू आहे. वाघनख्यांच्या खरेपणाबद्दलची शंका आणि त्यावरून निर्माण झालेला हा वाद शिवप्रेमींच्या मनात अस्वस्थता निर्माण करणारा ठरला आहे.
हेही वाचा :
एमएस धोनीचं बाईक प्रेम! लाखोंच्या बाईक अन् कोट्यवधींच्या कार
गणेशोत्सव गोड होणार! शिंदे सरकारकडून मिळणार ५६० कोटींचा आनंदाचा शिधा
आमदारांना शेअर मार्केटसारखा भाव, कुणाला २५ कोटी, तर… ; संजय राऊतांचा आरोप