मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी याने राधिका मर्चंट हिच्याशी विवाह(pregnant) केला. बीकेसी येथील जिओ वर्ल्ड सेंटर येथे हा विवाह पार पडला. १२ जुलै रोजी ते दोघे विवाहबद्ध झाले. या लग्नाला अनेक दिग्गज नेते आणि कलाकारांनी हजेरी लावली होती.
त्यात लोकप्रिय अभिनेत्री ऐश्वर्या राय हिने(pregnant) तिच्या लेकीसोबत हजेरी लावली होती. त्यानंतर रात्री उशिरा प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री दीपिका पादुकोण हिनेदेखील या लग्नाला हजेरी लावली होती. आता या दोन्ही अभिनेत्रींचा प्रेक्षकांचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय ज्यात त्या दोघी एकमेकींना घट्ट मिठी मारताना दिसत आहेत.
या लग्नसोहळ्याला दीपिका हजर राहणार नाही असं म्हटलं जात होतं मात्र तिने रात्री उशिरा एंट्री घेत सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. तिने या सोहळ्यासाठी लाल रंगाचा ड्रेस परिधान केला होता. सुंदर असा ड्रेस आणि त्यावर भरलेली ओढणी तिने घेतली होती. आपलं सात महिन्यांचं पोट फ्लॉन्ट करत तिने मोठ्या दिमाखात या लग्नात एंट्री केली होती.
आता ऐश्वर्या आणि दीपिका यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यात ऐश्वर्या दीपिकाला पाहून भावुक झालेली पाहायला मिळतेय. ऐश्वर्या तिला घट्ट मिठी मारते. दीपिकाला पाहून ऐश्वर्या रडताना दिसतेय. तिच्या डोळ्यात पाणी आहे. तर दीपिका तिला शांत होण्यासाठी सांगतेय आणि तिच्या पाठीवरून हात फिरवतेय.
हा व्हिडिओ पाहून चाहते त्यांच्यावर फिदा झाले आहेत. तर ऐश्वर्याला रडताना पाहून चाहतेही भावुक झाले आहेत. आपण ऐश्वर्याला असं कधीही पाहिलं नाही, ऐश्वर्या खरंच मानाने खूप चांगली आहे, एक अभिनेत्री दुसऱ्या अभिनेत्रीची काळजी करतेय, एकाच फ्रेममध्ये दोन दिग्गज अभिनेत्री अशा प्रतिक्रिया देत नेटकऱ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्यांचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
हेही वाचा :
बाहेर पडताना काळजी घ्या! राज्यात ‘या’ भागात आज अतिवृष्टीचा इशारा
नंबर 2 दूर नाही… भारत बनणार जागतिक महासत्ता, अमेरिकेला धोबीपछाड
काळोख्या रात्री स्मशानात चालू ‘हे’ काम; पोलिसांच्या ताब्यात प्रीयसी-प्रियकर…