विशाळगड अतिक्रमण प्रकरण तापलं! स्थानिकांना अज्ञातांकडून मारहाणीचा आरोप

कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगडावरील अतिक्रमणाच्या मुद्द्याला हिंसक वळण(meet locals) मिळाल्याचं पाहायला मिळत आहे. विशाळगडावरील अतिक्रमण त्वरित काढण्यासाठी हिंदुत्ववादी संघटनांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. असं असतानाच आता विशाळगडावर स्थानिक नागरिकांना मारहाण झाल्याची माहिती समोर येत आहे. तर काही अज्ञातांनी विशाळगडावजळील घरांवर दगडफेक केली आहे.

हिंदुत्ववादी संघटनांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर विशाळगड परिसरात(meet locals) जमावबंदीचा आदेश आधीच लागू करण्यात आला आहे. विशाळगड परिसरात पोलिसांचा मोठा फौजपाठा तैनात असून या परिसरामध्ये तणाव दिसत आहे.

अतिक्रमण हटवण्यासाठी संभाजीराजे सकाळीच विशाळगडाकडे रवाना झाले आहेत. त्याआधीच गदडफेक करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. दगडफेक कोणी केली याची माहिती नाही. स्थानिकांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे. व्हिडिओमध्ये दगड जमिनीवर पडल्याचं स्पष्ट दिसत आहेत.

विशाळगडावर अतिक्रमण होत आहे. ते खपवून घेतलं जाणार नाही. विशाळगड संकटात आहे, असं संभाजीराजे छत्रपती म्हणाले होते. अनेक संघटनांनी देखील विशाळगडावरील अतिक्रमण हटवण्यासाठी आंदोलन केले होते. संभाजीराजे हजारो शिवभक्तांसह विशाळगडाकडे जात आहेत. त्याआधीच हा प्रकार घडला असल्याने तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस तैनात करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

दगडफेक झाल्याचं स्थानिकांनी सोशल मीडियावरून व्हिडिओ शेअर करून सांगितलं आहे. प्रत्यक्ष परिस्थिती पाहून यावर बोलू असं संभाजीराजे म्हणाले आहेत. सध्या विशाळगडावर मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. मोठ्या प्रमाणात शिवभक्त विशाळगडावर येणार नाहीत याची खबरदारी घेतली जात आहे.

शंभुराजे देसाई यांना यावर विचारले असता ते म्हणाले की, सध्या नेमकं काय घडलंय याची माहिती नाही. मी तात्काळ तेथील जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिकाऱ्यांना याबाबत संपर्क करून आवश्यक त्या सूचना करेन. आवश्यक ती खबरदारी घेतली जाईल.

हेही वाचा :

पुढच्या महिन्यात दोन मोठ्या ग्रहांची चाल बदलणार; ‘या’ 3 राशी होणार मालामाल

मोठी बातमी! अजित पवारांना मिळालेल्या ‘क्लीन चिट’ला नव्यानं आव्हान

ओवैसी – जरांगे एकत्र येणार?, महायुतीसह माविआचं टेन्शन वाढणार