राज्यातील राजकारणातील मोठी बातमी समोर आली आहे(news). सूत्रांच्या माहितीनुसार, अजित पवार विधानसभा निवडणूक बारामतीतून न लढवण्याची तयारी करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आज होणाऱ्या मेळाव्यात अजित पवार मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अजित पवार यांचे पुतणे योगेंद्र पवार(news) हे बारामतीमधून विधानसभेची निवडणूक लढवतील, असा अंदाज वर्तवला जात आहे. त्यामुळे बारामतीत पुन्हा काका-पुतण्यामध्ये सामना होण्याची शक्यता आहे. अजित पवार यांनी साम टीव्हीच्या प्रतिनिधीशी बोलताना या चर्चांवर स्पष्टीकरण दिले असून, त्यांनी बारामती सोडणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंड करत भाजपसोबत हात मिळवणी केली आणि सत्तेत सामील झाले होते. महायुतीत सामील झाल्यानंतर त्यांनी लोकसभा निवडणुकीत सहभाग घेतला. त्यावेळी शरद पवार आणि अजित पवार यांच्या काका-पुतण्याच्या वर्चस्व वादाची लढाई पाहायला मिळाली होती. आता विधानसभेतही अशीच लढाई होण्याची शक्यता आहे.
गेल्या काही दिवसांपासून योगेंद्र पवार राजकारणात सक्रीय झाले आहेत. शरद पवार यांच्या अनेक कार्यक्रमात ते दिसले होते. त्यामुळे बारामतीत पुन्हा योगेंद्र पवार आणि अजित पवार यांच्यात सामना रंगणार असल्याची चर्चा आहे. परंतु, अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे की, “मी बारामती सोडणार नाही.”
हेही वाचा :
… म्हणून अक्षय कुमारने चित्रपटात येण्यापूर्वी बदललं नाव
अमेरिका माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प गोळीबार Video
विशाळगड अतिक्रमण प्रकरण तापलं! स्थानिकांना अज्ञातांकडून मारहाणीचा आरोप