इचलकरंजी येथील नामांकित कंपनी स्टॉर्मसॉफ्ट्स टेक्नॉलॉजी (organization) यांनी एआय (आर्टिफिशल इंटेलिजन्स) विषयावर अभियांत्रिकी विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांना मार्गदर्शन करण्याचा सोहळा व इंटर्नशिपच्या मुलांचा प्रमाणपत्र वितरण सोहळा आयोजित केला होता. या मध्ये 150 पेक्षा जास्त वेगवेगळ्या कॉलेजच्या मुलांनी व पालकांनी यामध्ये सहभाग घेतला होता. कार्यक्रमाची सुरुवात स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमा पूजनाने पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आली. मान्यवरांच्या स्वागतानंतर इंटरनशिप केलेल्या विद्यार्थ्यांनी आपले अनुभव सर्वांसमोर मांडले. तसेच पालकांनीही स्टॉर्मसॉफ्ट्स टेक्नॉलॉजी कंपनीबद्दल आपले विचार व्यक्त केले.
या कार्यक्रमात (organization) डॉ. तहसीन मुल्ला सर, कॉम्प्युटर (आय ओ टी) विभागाचे विभागप्रमुख (HOD), एडीसीईटी आष्टा यांनी विद्यार्थ्यांना एआयमध्ये करिअरच्या संधींबद्दल सखोल मार्गदर्शन केले. यानंतर दुसरे प्रमुख पाहुणे, बळवंत गोरड, सीनियर एआय लीड, टाटा कम्युनिकेशन्स लिमिटेड, पुणे यांनीही आर्टिफिशल इंटेलिजन्स आणि डेटा सायन्सबद्दल विद्यार्थ्यांना माहिती दिली व त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाची सांगता करताना स्टॉर्मसॉफ्ट्स टेक्नॉलॉजी कंपनीचे संस्थापक आणि सीईओ, अंकुश पोळ यांनी विद्यार्थ्यांचे व पालकांचे आभार मानले. त्यांनी विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक आणि व्यावसायिक वाटचालीसाठी मदतीचे आश्वासन दिले. तसेच, कंपनीच्या विविध उपक्रमांमधील सहभागाबद्दल आणि विद्यार्थ्यांच्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केले.
कार्यक्रमातील (organization) मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांना एआय आणि त्याच्या विविध पैलूंबद्दल सखोल माहिती मिळाली. तसेच, पालकांनाही आपल्या मुलांच्या करिअरच्या संधींबद्दल अधिक स्पष्टता आली. स्टॉर्मसॉफ्ट्स टेक्नॉलॉजीच्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या भविष्याची वाटचाल अधिक सुकर होण्यास मदत होईल अशी अपेक्षा आहे.
या कार्यक्रम प्रसंगी एस आय टी पॉलिटेक्निक कॉलेजच्या आयटी विभागाच्या विभाग प्रमुख व स्टाफ मेंबर तसेच सुहास शिंदे, संतोष माने, अरुण कुंभार, राजेंद्र पाटील, करिष्मा नदाफ, नम्रता चौगुले , श्रेयस माळी, सुप्रिया पोळ, अजय सर, आरती मॅडम, आदर्श माळी, शंतनू कांबळे, आदित्य लायकर अदी उपस्थित होते.
हेही वाचा :
अमेरिकेतील डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर गोळीबार, पंतप्रधान मोदींनी सोशल मीडियावर व्यक्त केला संताप..
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची पंढरपुरात ‘आषाढी’ आधी बुलेटवरून पाहणी
भाज्यांचे दर वाढले, महागाईचा तडका, हॉटेल मालकांचा मोठा निर्णय