उद्योगपती मुकेश अंबानी यांचे धाकटे पुत्र अनंत अंबानी आणि बिझनेसमन(a businessman) वीरेन मर्चंट यांची कन्या राधिका मर्चंट हे नुकतेच लग्नबंधनात अडकले आहे. १२ जुलैला मुंबईतल्या बीकेसीमधील जियो वर्ल्ड कन्वेंशन कल्चरल सेंटरमध्ये अनंत- आणि राधिका यांनी मोठ्या थाटामाटात हिंदू परंपरेनुसार विवाह बंधनात अडकले. या सोहळ्यासाठी सर्वच क्षेत्रातील महत्त्वाचे मान्यवर उपस्थित होते.
शिवाय, भारतीय क्रिकेट संघातील सर्वच खेळाडूही(a businessman) या लग्न सोहळ्यासाठी उपस्थित होते. भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने या नवविवाहित दाम्पत्यासाठी एक खास पोस्ट शेअर केलेली आहे.
एम.एस. धोनीने शेअर केलेल्या पोस्टमध्ये, अनंत- राधिका यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. धोनीने एक फोटो शेअर केला असून त्याने सुंदर कॅप्शनही दिलं आहे. शेअर केलेल्या फोटोमध्ये, राधिकाने धोनीला मिठी मारलेली दिसत आहे. तर धोनीही थोरल्या भावाप्रमाणे तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करताना दिसत आहे. राधिकाच्या चेहेऱ्यावर हसू आणि आनंदाश्रू पाहायला मिळत आहे. शिवाय तिच्या भांगेमध्ये कुंकूही दिसत आहे.
शेअर केलेल्या पोस्टमध्ये, एम.एस. धोनीने अनंत अंबानी यांना राधिकाची कशी काळजी घ्यायची याबाबतचा सल्ला दिला आहे. पोस्टमध्ये एम. एस. धोनीने लिहिले की, ” राधिका तुझ्या चेहऱ्यावरील हा आनंद कायमच असाच ठेव. अनंत, कृपया तु तुझ्यासोबत राहणाऱ्या लोकांसोबत जसा प्रेमाने आणि आदराने वागतोस, तसाच तू तिच्यासोबत राहा आणि तिची काळजी घे. तुमचं वैवाहिक जीवन आनंदाने, सुखाने, हास्याने आणि साहसाने भरलेलं असावं. अभिनंदन आणि लवकरच भेटू!” ही पोस्ट शेअर करताना अभिनेत्याने ‘बाबा मे तेरी मलिका’ हे गाणं लावलं आहे. शिवाय एम.एस. धोनीची पत्नी साक्षी सिंहनेही नवविवाहित दाम्पत्याला शुभेच्छा दिलेल्या आहेत.
हेही वाचा :
विजेच्या करंटचा शॉक! शेतकरी महिलेचा दुर्दैवी मृत्यू
मराठा आरक्षणासाठी स्वतंत्र कोटा: ओबीसी आरक्षण कायम राहील, शंभुराज देसाई यांची घोषणा