कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : भेद नीती, भय नीती, गनिमी कावा या तिन्ही अस्त्रांचा अतिशय (politics)कुशलतेने, प्रभावीपणे वापर केला गेला तो अफजलखानाचा खात्मा करण्यासाठी. हे प्रकरण इतिहासातील सुवर्ण पान समजलं जाते. पराक्रमाची परिसीमा मानली जाते. स्वराज्यावरील आलेले संकट दूर करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी वाघ नख
हे आगळे वेगळे शस्त्र वापरले. आणि म्हणूनच हे शस्त्र आज तमाम शिवप्रेमींसाठी अभिमानाचे, अस्मितेचे ठरले आहे.
सतराव्या शतकात वापरली(politics) गेलेली ही वाघ नख 21व्या शतकात वादग्रस्त ठरली आहेत, किंवा ठरवली गेली आहेत. मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी लंडनच्या जगप्रसिद्ध अल्बर्ट म्युझियम मधून तीन वर्षाच्या करारावर ऐतिहासिक वाघनख आणण्याचा करार केला आणि त्यानंतर महाराष्ट्रात ही वाघनखन खरी आहेत की खोटी यावर वादंग सुरू झाले आहे.
इसवी सन 1944 मध्ये प्रकाशित झालेल्या एका पुस्तकाचा, लंडनच्या अल्बर्ट म्युझियमच्या संचालकांच्या पत्राचा आधार घेऊन इतिहासाचे अभ्यासक इंद्रजीत सावंत यांनी इंग्लंड मधून इथे आणली जाणारी वाघ नख ही खरी नाहीत. अफजलखानाच्या वधासाठी वापरलेली ही वाघ नखं नाहीत असा दावा करून वाघनखांविषयी प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा वध करण्यासाठी हीच वागणं वापरली होती याचा पुरावा आमच्याकडे नाही असा खुलासा म्युझियमच्या संचालकांनी केला आहे. म्हणून ती वाघनखं खरी नाहीत असा सावंत यांचा दावा आहे. पण ही वाघ नको 100% खरी नाहीत याचाही पुरावा म्युझियमकडे नाही.
गन मेटल किंवा तत्सम धातूपासून तयार करण्यात आलेली ही वाघनख आहेत. ब्रिटिशांनी कोहिनूर हिरा, मयूर
आसन, अशा कितीतरी ज्यांचे मूल्य होऊ शकत नाही अशा अमूल्य वस्तू इंग्लंडमध्ये नेल्या. त्यात वाघ नखांचाही समावेश आहे. ही साधी गनमेटलची, कुठेही मिळणारी वाघ नखं असतील तर ब्रिटिशांनी ती आपल्या म्युझियममध्ये ठेवण्यासाठी नेलीच नसती. या वाघ नखांच ऐतिहासिक मूल्य असल्यामुळेच त्यांनी ती तिकडे नेलेली आहेत. म्हणूनच ती खरी असण्याची शक्यता जास्त आहे, तसे नसेल तर ती म्युझियममध्ये कडेकोट बंदोबस्तात ठेवण्याचे त्यांना कारणच उरत नाही. करार करून ती भारताच्या म्हणजे महाराष्ट्राच्या ताब्यात तीन वर्षांसाठी दिली जाणार आहेत. करार केला जातो त्याअर्थी त्यांचे महत्त्व अधोरेखित होते.
इंद्रजीत सावंत हे इतिहासाचे अभ्यासक आहेत. त्यांचं म्हणणं असं आहे की अफजल खान वधासाठी वापरलेली वाघनख ही सातारच्या राजघराण्याकडे आहेत. पण त्याला छत्रपती उदयनराजे भोसले किंवा शिवेंद्र सिंह राजे भोसले यांनी दुजोरा दिलेला नाही. खरी वाघनखं आमच्याकडे आहेत असा दावा त्यांनी केलेला नाही. त्यामुळे सावंत यांचा दावा संभ्रम निर्माण करणारा आहे.
महाराष्ट्रात (politics)आणली जाणारी वाघ नख ही खरी नाहीत. ती बनावट आहेत. शिवप्रेमींची दिशाभूल करणारी आहेत असे सावंत हे एकटेच सांगतात. महाराष्ट्रात कितीतरी इतिहास संशोधक आणि इतिहास अभ्यासक आहेत. त्यांच्यापैकी सावंत यांच्या दाव्याचे समर्थन करण्यासाठी कुणीच पुढे आलेले नाही. उदयन राजे भोसले यांनीच पुढे येऊन सत्य काय आहे ते समोर आणले पाहिजे. अस्सल वाघ नख आमच्याकडे आहेत किंवा आमच्याकडे नाहीत हा खुलासा त्यांच्याकडूनच अपेक्षित आहे. इतिहास संशोधक जयसिंगराव पवार, बेडेकर आदी मंडळींनी वाघनखांविषयी वस्तुस्थिती स्पष्ट केली पाहिजे किंवा महाराष्ट्र इतिहास परिषदेने वाघनखक खरी किंवा खोटी आहेत याचे स्पष्टीकरण केले पाहिजे. कारण ही वाघ नख सातारा, कोल्हापूर येथेही शिवप्रेमींसाठी आणली जाणार आहेत. हजारो शिवप्रेमी ती वाघ नख पाहणार आहेत. त्या वादनखांबद्दल संभ्रम निर्माण झाला तर ते आणण्यामागचा राज्य शासनाचा हेतू सफल होणार नाही.
छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव घेऊन सत्ताकारण केलं जातं. त्यांच्या नावाचा प्रत्येक राजकारण्याकडून वापर केला जातो आहे. पण आता छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा वध करण्यासाठी वापरलेल्या वाघनखांचेही राजकारण सुरू झाले आहे. कोल्हापुरात उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेकडून निदर्शनेही केली गेली आहेत. खोटी वाघनख आणून तमाम शिवप्रेमींची फसवणूक करणाऱ्या मंत्री सुधीर मनगुंटीवार यांनी महाराष्ट्रातील जनतेची माफी मागितली पाहिजे यासाठी ठाकरे गटाच्या शिवसेनेने शनिवारी बिंदू चौकात निदर्शने केली.
हेही वाचा :
मालिका विश्वाचे स्वप्न दाखवत ऑनलाईन लूट
मराठा आरक्षणासाठी स्वतंत्र कोटा: ओबीसी आरक्षण कायम राहील, शंभुराज देसाई यांची घोषणा