पुणे : कोंढवा भागात लेबर कॅम्पमधील कॅन्टीनमध्ये जेवणाच्या टेस्टवरून कामगार(hammer) व हॉटेलच्या शेफमध्ये वाद झाल्यानंतर कामगाराने शेफच्या चेहऱ्यावर हातोडा मारून खून केल्याची धक्कादायक घटना घडली. दरम्यान, पोलिसांनी कामगाराला ताब्यात घेतले असून, यामध्ये कामगाराने कॅन्टीनच्या एका कामगाराला देखील जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे. दुपारी दोनच्या सुमारास ही घटना घडली आहे.
शुभम शास्त्री सरकार (वय ६३) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी(hammer) कमल नारायण मार्डी (वय ४९, रा. बंगाल) याला ताब्यात घेतले आहे. यामध्ये रामप्रीत मंडल (वय ३५) हा गंभीररित्या जखमी झाला आहे. याप्रकरणी कोंढवा पोलिसांत गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, उंड्री चौकाच्या परिसरात मिलेनियम लेबर कॅम्प आहे. याठिकाणी कामगारांसाठी कॅन्टीन आहे. दुपारी दोनच्या सुमारास कामगार कमल हा जेवण्यासाठी गेला होता. त्याने जेवण घेतले. परंतु, जेवणाच्या टेस्टवरून त्याने वाद घातला. शेफ शुभम याच्याशी वाद सुरू झाल्यानंतर त्यांच्यात कडाक्याचे भांडण झाले. तेव्हा कामगार कमल याने त्याच्या हातातील हातोडा शेफ शुभम याच्या चेहऱ्यावर मारून गंभीर जखमी केले.
तर, साक्षीदार रामप्रीत मंडल याच्याही डोक्यात हातोडा मारून गंभीर जखमी केले. घटनेची माहिती मिळताच कोंढवा मार्शलने घटनास्थळी धाव घेतली. तसेच, जखमींना ससून रुग्णालयात दाखल केले. परंतु, उपचारापुर्वीच शेफ शुभम यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. यानंतर पोलिसांनी कमल याला ताब्यात घेतले. पुढील तपास सुरू आहे.
हेही वाचा :
सोने होणार स्वस्त! देशभरात असणार एकच भाव
अनंत-राधिकाच्या लग्नात हार्दिक पांड्या 2 टकिला मागतानाचा VIDEO व्हायरल!
आघाडीतून बाहेर पडण्याची ठाकरेंची धमकी, पडद्यामागे उलथापलथी