तुळजाभवानी मंदीरात मागील काही दिवसांपू्र्वी देवीला चॉकलेटचा हार(anger issues) चढवण्याच्या घटनेनंतर, भाविकांमध्ये संतापाची लाट उसळली होती. आता पुन्हा एकदा भाविकांच्या श्रध्देचा अपमान होत असल्याचे दिसून आले आहे. भाविकांनी आणलेल्या विलायची आणि लवंगाचा हार देवीला न चढवल्याने, भाविक आणि तुळजाभवानी भोपे पुजारी मंडळाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
तुळजाभवानी भोपे पुजारी मंडळाचे अध्यक्ष अमरराजे कदम यांनी आपल्या प्रतिक्रियेत(anger issues) मंदीर प्रशासनावर जोरदार टीका केली आहे. “मंदीर प्रशासन चुकीच्या लोकांच्या मागणीला ग्राह्य धरुन भक्तांवर अन्याय करत आहे. भाविकांनी मोठ्या श्रद्धेने आणलेल्या वस्तूंना देवीला वाहण्यासाठी आलेली श्रद्धा मंदीर प्रशासनाने लक्षात घ्यावी,” असे त्यांनी सांगितले.
अमरराजे कदम यांच्या मते, “अनादी कालापासून चालत आलेला कौल मागण्याचा विधी बंद केलाय. भक्तांनी आणलेला हार कशाचाही असो, त्यामागील भक्तांची श्रध्दा प्रशासनाने लक्षात घ्यावी. मुळात देव हा भाविकांसाठी असतो. त्यामुळे मंदीर प्रशासनाने याची नोंद घ्यावी. चुकीच्या लोकांनी केलेल्या चुकीच्या मागण्या नाकाराव्यात,” अशी मागणी त्यांनी केली आहे.
तुळजाभवानी मंदीर प्रशासनाच्या निर्णयाने भाविकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. या घटनांनी पुन्हा एकदा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. भाविकांच्या श्रद्धेचा सन्मान होईल आणि मंदीर प्रशासन योग्य निर्णय घेईल, अशी अपेक्षा आहे.
हेही वाचा :
कमी करण्यासोबतच बद्धकोष्ठतेला दूर करण्यासाठी ‘हा’ पदार्थ ठरेल रामबाण!
डोंबिवलीच्या भाजीविक्रेत्या आईचा लेक सीए झाला, प्रेरणादायी व्हिडिओ व्हायरल
महाराष्ट्रातील राज्यात पुन्हा मंत्रिमंडळ विस्ताराची संभाव्य अवधारणा