तारक मेहता का उल्टा चष्मा गेल्या अनेक दिवसांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन(marriage) करत आहे. तारक मेहता हा शो सोनी टीव्हीचा लोकप्रिय शो आहे. या मालिकेचे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चाहते आहेत. चाहत्यांना या मालिकेतील प्रत्येक पात्र आवडते. भिडे असो की जेठालाल, बबिता जी, प्रत्येकाला या सर्वांचा अभिनय खूपच मनोरंजक वाटतो.
सध्या पोपटलालच्या लग्नाबाबत(marriage) मालिकेत अनेक घडामोडी घडत आहेत. जिथे मधुबाला नावाच्या मुलीने पत्रकार पोपटलाल सोबत अखेर लग्नासाठी हो म्हटलं आहे. यामुळे संपूर्ण गोकुळधाम सोसायटी खूप आनंदी असून ती पोपटलालच्या लग्नाच्या तयारीत व्यस्त आहे.
तारक मेहतामधील पोपटलालच्या लग्नाची तयारी जोरदार सुरु झाली आहे. लग्न एका दिवसात व्हायला हवे, नाहीतर वर्षभर शुभ मुहूर्त नसल्याचे मुलीच्या कुटुंबीयांनी सांगितले. अशा परिस्थितीत पोपटलालचा हा खास दिवस भव्यदिव्य करण्यासाठी गोकुळधाम सोसायटीतील लोक कोणतीही कसर सोडत नसल्याचं दिसत आहे. त्यांनी सर्व तयारी केली असून अंजली भाभी आणि रोशन भाभी यांनी पोपटभाईंच्या स्वागतासाठी काही खास योजना आखल्या आहेत.
काही वेळातच पोपटलाल येणार असल्याने सर्वजण वाट पाहत होते. मात्र, काही वेळानंतर पोपटलाल न आल्याने सर्वांना एक धक्का बसतो. पोपटलाल यांची खोली रिकामी असल्याचं सर्वांना समजतं. त्यानंतर भिडे पोपटलाल यांना फोन लावण्याचा प्रयत्न करतात.
मात्र, पोपटलाल यांचा फोन बंद असतो. त्यानंतर चालू पांडे गोकुळधाम सोसायटीमधील सर्वांवर संशय घेतो आणि म्हणतो की, तुम्ही लोकांनी त्याला लपवले आहे. तेवढ्यात जेठालालही येतात आणि पोपट न सापडल्याने त्यांनाही धक्का बसतो. त्यामुळे यावेळी देखील पोपटलाल सिंगल राहतात का? हे बघावे लागणार आहे.
हेही वाचा :
खासदार सुनेत्रा पवार शरद पवारांच्या भेटीला…
देशातील तरुणांसाठी खुशखबर! बेरोजगारीच्या संकटात टाटांनी दाखवलं मोठं मन
शाहू महाराज विशाळगडाकडे रवाना, सतेज पाटीलही सोबतीला; 19 जुलैला एमआयएमचा कोल्हापुरात मोर्चा