ऐन एकादशीला एस.टी. कर्मचाऱ्यांचा संप, वारकाऱ्यांचे होणार प्रचंड हाल

आषाढी एकादशीच्या निमित्ताने एस.टी. महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी(employees) त्यांच्या विविध मागण्यासाठी एक दिवसाचा संप पुकारला असून यामुळे ‘माफ कर बा विठ्ठला’ आषाढी एकादशी दिवशी तुझ्या वारकर्यांची सेवा करू शकत नाही असे बॕनर लावून उद्याच्या संप पुकारल्याचे जाहीर केली आहे.

एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी(employees) सेवाशक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघ महाराष्ट्र राज्य वतीने एसटी कर्मचाऱ्यांना सेवा जेष्ठतेनुसार सातवा वेतन आयोग, कॅशलेस मेडिकल सुविधा या मागणीसह प्रलंबित सोळा मागण्यासाठी आषाढी एकादशी दिवशी बुधवारी ता. १७ रोजी राज्य सरकारला जाग यावी याकरिता एकदिवशी राज्यव्यापी संप करण्यात येणार आहे. एसटी कामगारांना राज्य सरकारने नेहमीच दुय्यम स्थान व वागणूक दिली आहे.

सन 2021 मध्ये एसटी कामगार व संपा दरम्यान तत्कालीन विधान परिषदेचे सभापती राम राजे निंबाळकर यांच्या दालनात सर्वपक्षीय आमदार यांची बैठक होऊन संपावर तोडगा काढण्यासाठी एसटी कर्मचाऱ्यांच्या सोळा मागण्या मान्य करूनही आजतागायत अंमलबजावणी झाली नाही. दरम्यान आमच्या संघटनेने राज्य सरकार व एसटी प्रशासनाच्या वारंवार पत्रव्यवहार करून ही राज्य सरकार मागण्या मान्य करत नाही.

दिनांक 20 डिसेंबर 2022 पासून हिवाळी अधिवेशन नागपुर येथे बेमुदत अमरण उपोषणचा इशारा दिल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या दालनात बैठक घेऊन एक महिन्यात प्रश्न निकाली काढू असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या समवेत बैठक आयोजित केली असून केवळ आश्वासन देण्यात आले नुसत्या आश्वासनावर पोट भरत नसून आमच्या संघटनेचे पदाधिकारी व सरचिटणीस सतीश मिटकरी यांनी जिल्हाधिकारी कार्यालय समोर तब्बल 35 दिवस आमरण उपोषण करूनही पुन्हा आश्वासनच मिळाले म्हणून म्हणून एसटी कर्मचारी गप्प राहणार नाही.

यासाठी आषाढी एकादशीच्या दिवशी एक दिवशी संपाच्या माध्यमातून गंभीर इशारा दिला असून आषाढी एकादशीच्या दिवशी एक दिवशीय संपाच्या माध्यमातून देशभरातून येणाऱ्या श्री विठ्ठल भक्त वारकऱ्यांची गैरसोय होणार असून त्यांच्या गैरसोईबद्दल सेवाशक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघाचे राज्य कार्यकारणीतील पदाधिकारी आज रोजी विठ्ठलाचे दर्शन घेऊन महाराष्ट्र शासनाला एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्याबाबत गांभीर्याने लक्ष द्यावे व वारकऱ्यावर होणाऱ्या त्रासांना श्री विठ्ठलाची व वारकऱ्याची माफी मागून आपल्याला न्याय हक्काच्या मागणीसाठी महाराष्ट्र राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन संपात सहभागी होण्याचे संघटनेचे सरचिटणीस सतीश जी मिटकरी यांनी आवाहन केले आहे.

राज्यभरातील वारकरी आषाढी वारीच्या निमित्ताने पंढरपूर येथे जात असतो मंगळवारी ता. १६ रोजी सर्व वारकरी पंढरपूर येथे विठ्ठलाच्या दर्शनासाठी जात असले तरी एकादशीच्या दिवशी दर्शन करून परत फिरणार्याची गोची होणार आहे. आता या संपाबाबत सरकार काय तोडगा काढणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा :

मलायका अरोराने नियॉन बिकीनीत ‘चाहत्यांना केले घायाळ

‘रोहित शर्मानंतर….’ गौतम गंभीरच्या एका मतावर ठरणार भारतीय संघाचं भवितव्य

तारक मेहतामधील पोपटलाल गायब, मधुबालासोबतचे लग्न मोडणार?