सोशल मीडियावर कायम अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत (python)मात्र सध्या सोशल मीडियावर एक भयानक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात चक्क एका भल्या मोठ्या अजगराने एका हरणाला गिळले आहे.साप तसेच अजगर हे अतिशय धोकादायक प्राणी आहेत हे लहानापासून ते मोठ्यापर्यंत सर्वांना माहिती आहे. सापाच्या हल्ल्यापासून अनेकदा वाचता येते मात्र अजगराच्या हल्ल्यात व्यक्ती असो दुसरा प्राणी वाचणं अतिशय कठीण आहे. यामुळे प्रत्येकजण या भयानक अजगराला घाबरतात.
लांबून जरी साप दिसला तरी आंगाचा थरकाप उडतो तर अजगर दिसला तर भल्याभल्यांना चांगलाच घाम फुटतो. सोशल मीडियावर याआधीही अजगराच्या हल्ल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. सध्या अशीच एक धक्कादायक घटना पुन्हा समोर आली आहे, ज्या घटनेला ऐकून प्रत्येकाच्या अंगावर काटा येईल.एका महाकाय अजगराने जिवंत हरीण गिळल्याचा धक्कादायकप्रकार समोर आला आहे. या संपूर्ण घटनेनं गावात एकच खळबळ उडाली आहे. भल मोठं हरिण खाल्ल्यानं अजगराला रेंगाळताही येत नव्हतं मात्र (python)ही संपूर्ण घटना आता चर्चेचा विषय ठरत आहे.
अजगराने हरिण खाल्ल्याचं संपूर्ण प्रकरण(python) छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील रोहिला गड परिरसरात घडलं आहे. या अजगराने जिंवत हरणाला गिळल्याने गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गावकऱ्यांनी तात्काळ सर्पमित्रला बोलावून अजगराती मुक्तता केली आहे.सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. सध्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरील या अकाउंटवर व्हिडिओ शेअर करण्यात आलेला आहे. त्यानंतर व्हिडिओला मोठ्या प्रमाणात व्ह्यूज मिळाले असून अनेक यूजर्संच्या कमेंट्सही येत आहेत. सोशल मीडियावर याआधीही आपण अजगराने चक्क महिलेला गिळले असल्याचे ऐकले असेल शिवाय अनेकदा काही प्राण्यांनाही अजगराने गिळल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
हेही वाचा :
उपवासाचा स्पेशल: घरीच बनवा मऊ-मऊ, जाळीदार फराळी ढोकळा
सांगली : चांदोली धरणात जलसाठा वाढल्याने वीजनिर्मितीला सुरुवात
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा संपन्न, आषाढीच्या उत्साहात भर