विशाळगडचा संवेदनशील प्रश्न राजकीय बनवला जातो आहे!

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : विशाळगडावर, पायथ्याशी गजापुरात, मुसलमान वाडीत गेल्या रविवारी(political) घडलेल्या घटना क्लेशदायक आहेत, वेदना देणाऱ्या आहेत, त्याचे समर्थन कोणीही करणार नाही. अप्रिय आणि अनुचित घटना घडून गेल्यावर प्रशासनाने अतिक्रमण हटाव मोहीम सोमवारपासून सुरू केली असली तरी ती आधीपासूनच केली असती तर हा संपूर्ण परिसर अति संवेदनशील बनला नसता. गडावरील वातावरण स्फोटक बनाले नसते. आधी हा विषय सामाजिक होता. नंतर तो धार्मिक आणि आता तो राजकीय बनवला गेला आहे. या प्रश्नावरून महाविकास आघाडी विरुद्ध महायुती यांच्यात इतिहासाची साक्ष काढून शाब्दिक लढाई सुरू झाली आहे. एम आय एम चे इम्तियाज जलील यांनी या संवेदनशील प्रश्नात तेल ओतण्यास सुरुवात केली आहे.

विशाळगडावरील सहा पक्की बांधकामे वगळता इतर अतिक्रमणे(political) काढून टाकण्यास न्यायालयाची हरकत नव्हती. पण प्रशासनाने तिकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले. परिणामी हा प्रश्न स्फोटक बनला आणि त्याचा उद्रेक रविवारी झाला. खासदार शाहू महाराज यांनी या संपूर्ण घटनेला संभाजी राजे छत्रपती यांना जबाबदार धरून त्यांचा निषेध केला आहे. त्यानंतर इम्तियाज जलील यांनी कोल्हापूरच्या छत्रपती घराण्यावरच निशाणा साधला आहे. छत्रपती घराण्याला आरोपीच्या पिंजऱ्यात उभा केले आहे. इतकेच करून ते शांत बसलेले नाहीत.

मुस्लिमांनी रस्त्यावर उतरून निदर्शने करावीत, निषेध व्यक्त करावा अशी चेतावणी दिली आहे. विशाळगड प्रश्नाला राज्यस्तरीय स्वरूप देण्याचा त्यांचा प्रयत्न दिसतो आहे. त्यांची ही कृती किंवा त्यांनी केलेले आवाहन हे आगीत तेल ओतणारे आहे. मुस्लिम मतदारांनीच तुम्हाला (शाहू छत्रपती यांना) खासदार बनवले आहे हे मुद्दाम सांगण्याचे किंवा आठवण करून देण्यामागे त्यांचे राजकारण दिसते. महाविकास आघाडीला लोकसभा निवडणुकीत जे मोठे यश मिळाले ते महाराष्ट्रातील मुस्लिम मतदारांच्या मुळे असे जलील यांना सुचित करावयाचे आहे. औरंगजेबचे उदातीकरण करणारा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कोल्हापूर शहरात दंगल झाली होती. तेव्हा हे इम्तियाज जलील व्यक्त झाले नव्हते. ते आत्ताच व्यक्त होऊन चेतावणी देत आहेत हे इथे लक्षात घेतले गेले पाहिजे. सर्वप्रथम त्यांच्याकडूनच विशाळगडचा संवेदनशील प्रश्न राजकीय बनवला गेला आहे असे म्हणावे लागेल.

एक दीड वर्षांपूर्वी कोल्हापूर शहर हे दंगलखोरांच्या हाती गेले होते(political). अनुचित घटना घडल्या होत्या. तेव्हा शाहू महाराज छत्रपती यांच्या नेतृत्वाखाली सिद्धार्थ नगर येथील शाहू समाधी स्थळापासून शिवाजी चौकापर्यंत शांतता रॅली काढण्यात आली होती. “आम्ही भारतीय लोक आंदोलना “च्या बॅनरखाली ही रॅली काढण्यात आली होती. आता अशीच शांतता रॅली काढण्यात येणार आहे पण ती इंडिया आघाडीच्या वतीने. आणि ही आघाडी राजकीय आहे. म्हणूनच या आघाडीने विशाळगडचा प्रश्न राजकीय बनवला आहे असे म्हणता येईल आणि हा राजकीय प्रश्न आता थेट नवीन राजवाड्यात पोहोचला आहे, हे सुद्धा प्रथमच घडत आहे.

शरद पवार यांनी विशाळगड परिसरात घडलेल्या घटनांबद्दल चिंता व्यक्त केली आहे तर पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी संभाजी राजे यांना पुरोगामीत्वाची आठवण करून दिली आहे. त्यांच्यावर पलटवार करताना विशाळगडावर यासीन भटकळसारखा दहशतवादी मुक्कामास होता त्याबद्दल तुम्ही गप्प का होतात असा सवाल संभाजी राजे यांनी त्यांना विचारला आहे. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशाळगडावर, पायथ्याशी एकही अतिक्रमण शिल्लक ठेवणार नाही. गडावर जी पक्की बांधकामे झाली आहेत त्याबद्दल तुमची भूमिका स्पष्ट करा अशा शब्दात महाविकास आघाडीला त्यांनी डिवचले आहे.

विशाळगडावर दंगल करणारे समाजकंटक हे पुणे येथील होते असा आरोप सतेज पाटील यांनी केला आहे. मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनाच त्यांनी या प्रत्यक्षपणे यानिमित्ताने रडारवर आणले आहे. कोल्हापूरचे पोलीस प्रमुख पंडित हे अकार्यक्षम आहेत. ते कोल्हापुरात आल्यानंतरच अप्रिय आणि अनुचित घटना घडलेल्या आहेत. म्हणून त्यांची तातडीने बदली करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे. विशाळगडावर त्या संदर्भातील अति संवेदनशील प्रश्नावरून सुरू झालेल्या राजकारणात आता प्रशासनालाही ओढण्यात आलेले आहे, हे यावरून सुचित होते.

हेही वाचा :

ब्रेकअपनंतर मलायका पुन्हा प्रेमात? मिस्ट्री मॅनसोबतच्या फोटोमुळे चर्चांना उधाण

गुरुकृपा इलेक्ट्रॉनिक्स आणि इलेक्ट्रिकल कडून आषाढी एकादशी निमित्त शाबू खिचडीचे वाटप

महाराष्ट्रातील मंत्रिमंडळ विस्ताराबाबत दिल्लीतून घेण्यात आला मोठा निर्णय