मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याची लेक सारा तेंडुलकर सध्या सोशल मीडियावर(filmy4wap) चर्चेचा विषय बनली आहे. साराचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. त्या व्हिडिओमुळे सारा बॉलिवूड चित्रपटात काम करणार असल्याच्या खमंग चर्चा रंगत आहेत.
सारा तेंडुलकरचा रॉयल ब्लु कलरच्या ड्रेसमधला (filmy4wap)व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये सारा एकदम सुंदर दिसत आहे. तिच्या मागे एक चालत येणारा ग्रुप दिसत आहे. सारा तेंडुलकरचा हा व्हिडिओ मुंबईच्या पाली हिल या भागातील आहे. या व्हिडिओमध्ये सारा एका वैनिटी व्हॅनकडे जाताना दिसत आहे. त्यामुळं साराच्या चाहत्यांनी कमेन्टचा पाऊसचा पाडला आहे.
सारा तेंडुलकर बाबत अनेक अफवा पसरत असून अभिनयाच्या विश्वात सारा एन्ट्री करत असल्याचं बोलल जात आहे. सोशल मीडियावर साराचे मोठा फॅन फॉलोवर असल्यामुळं या अफवेला नेटकऱ्यांनी चांगलंच डोक्यावर घेतलं आहे. अनेक चाहत्यांनी तिच्या फोटोवर कमेंट करत आश्चर्य देखील व्यक्त केलं आहे.
सचिन तेंडुलकर आणि त्याच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तींनी सारा बॉलिवूड चित्रपटात दिसणार असल्याबाबत माहिती दिलेली नाही. तसंच साराने देखील या अफवेबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. त्यामुळं साराच्या बॉलिवूड अभिनायाच्या एन्ट्रीच्या चर्चेला सध्या सोशल मीडियावर पुर्णविराम मिळत नाहीये.. सारा खरंच अभिनय क्षेत्रात पदार्पण करते का? याबाबत चाहत्याची उत्सुकता शिगेला लागली आहे.
सोशल मीडियावर सारा नेहमीच एक्टिव्ह असल्याचं दिसून येत. तिचे मिलियन्स चाहते कायमच तिच्या पोस्टवर कौतुकाचा वर्षाव करतात. गेल्या अनेक दिवसाआधी देखील सारा आणि शुभमन गिलच्या रिलेशनशिपबाबत चर्चा जोर धरू लागल्या होत्या. सारा आणि शुभमनची बहीण अनेकदा एकत्र दिसून आले होते. परंतु स्पेनमधील एका तरुणीसोबत गिलचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यापासून सारा-गिलच्या रिलेशनशिपच्या चर्चा मावळू लागल्या आहेत. हे सगळं असलं तरी सध्या सारा बॉलिवूडमध्ये पदार्पण करते की नाही? हा प्रश्न अनुत्तरित आहे. त्यामुळं येणाऱ्या काळात सारा अभिनेत्रीच्या रुपात पहायला मिळते का हे पहाणं उत्सुकतेच ठरणार आहे.
हेही वाचा :
अभिनेत्री रिचा चढ्ढानं दिला गोंडस मुलीला जन्म
बायकोनं बीचवर फिरायला जायचा हट्टच धरला; नवऱ्यानं असा धडा शिकवला की…Video
विशाळगडप्रकरणी इम्तियाज जलील यांचा कोल्हापूर दौरा रद्द, उद्या राज्यभरात निदर्शने