मुंबई: बॉडी बिल्डिंग (body building) साठी वापरल्या जाणाऱ्या सप्लिमेंट पावडरमध्ये अज्ञात अमिनो ॲसिड वापरणाऱ्या ‘बिग मसल्स’ कंपनीला ग्राहक तक्रार निवारण आयोगाने चांगलाच दणका दिला आहे. कंपनीच्या भ्रामक जाहिराती आणि आरोग्याला हानीकारक असलेल्या उत्पादनाबद्दल आयोगाने कंपनीला ३६,४०९ रुपयांचा दंड ठोठावला आहे.
ग्राहकाने केलेल्या तक्रारीनुसार, कंपनीने आपल्या उत्पादनात साखर नसल्याचा आणि २४ ग्रॅम प्रोटीन (body building) असल्याचा दावा केला होता. मात्र, ग्राहकाने केलेल्या चाचणीत उत्पादनात अज्ञात अमिनो ॲसिड आढळून आले. यामुळे ग्राहकाने आयोगाकडे दाद मागितली.
आयोगाने या प्रकरणाची सखोल चौकशी केली असता, या सप्लिमेंट पावडरमुळे डोकेदुखी, पुरळ, मळमळ, अतिसार यासारखे अल्पकालीन आणि हृदयविकार, यकृत निकामी होणे यासारखे दीर्घकालीन दुष्परिणाम होऊ शकतात, असे निदर्शनास आणून दिले.
यामुळे आयोगाने कंपनीला ग्राहकाची संपूर्ण रक्कम परत करण्यासह ३६,४०९ रुपयांचा दंड ठोठावला आहे. ही घटना ग्राहकांच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी ग्राहक न्यायालयांची भूमिका अधोरेखित करते.
हेही वाचा :
वूमन्स आशिया कप 2024: इंडिया-पाकिस्तान महामुकाबला, सामना कुठे पाहता येणार?
पंढरपूरहून परतणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला, जीप कोसळून ७ ठार
इचलकरंजीच्या विकासाला भरारी! २० कोटींच्या निधीमुळे पायाभूत सुविधांना चालन