नव्वदीच्या दशकात काही चित्रपटांमध्ये झळकलेले अभिनेते आणि टी-सीरिज या कंपनीने(breath) सह-मालक कृष्ण कुमार यांची मुलगी तीशा कुमार हिचे निधन झाले आहे. ती अवघ्या 21 वर्षांची होती. कॅन्सरसोबत सुरू असलेली तिची झुंज अपयशी ठरली. तीशा कुमारच्या निधनाने सिनेसृष्टीत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. तीशा कुमार हिच्यावर जर्मनीत उपचार सुरू होते.
मात्र, उपचारादरम्यान तिची प्राणज्योत मालवली(breath). तीशा कुमार ही सिनेजगताच्या ग्लॅमरस झगमगाटापासून दूर होती. अॅनिमल या चित्रपटाच्या एका पार्टीत तिने वडील कृष्ण कुमार यांच्यासोबत दिसली होती. त्यावेळी तिने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले होते.
काही महिन्यांपूर्वी तीशा कुमारला कर्करोगाचे निदान झाले होते. त्यानंतर तिच्यावर उपचार सुरू करण्यात आले. तीशाला पुढील उपचारासाठी जर्मनीतील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर गुरुवारी रात्री उशिरा रुग्णालयात उपचारा दरम्यान तिची प्राणज्योत मालवली. तीशाची कर्करोगासोबतची झुंज अपयशी ठरल्याने सगळीकडे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
अभिनेता आणि टी-सीरिज या कंपनीचे सह-मालक म्हणून कृष्ण कुमार यांची ओळख आहे. नव्वदीच्या दशकात त्यांची भूमिका असलेले मोजकेच चित्रपट चांगलेच गाजले. 1995 मध्ये रिलीज झालेला बेवफा सनम चित्रपटाने त्यांना ओळख मिळवून दिली. या चित्रपटातील ‘अच्छा सिला दिया तुने मेरे प्यार का’ हे गाणं चांगलंच गाजलं होतं. आजही हे गाणं लोकप्रिय आहे.
Producer #KrishanKumar and daughter #TishaaKumar graced the #SpecialScreeningofAnimal recently! #Bollywood pic.twitter.com/I2PF2RXY3f
— Filmyape (@Filmyape) December 2, 2023
टी-सीरिज कंपनीचे मालक गुलशन कुमार यांचे ते धाकटे बंधू आहेत. गुलशन कुमार यांची हत्या केल्यानंतर त्यांनी टी-सीरिजची धुरा सांभाळली. त्यानंतर गुलशन कुमार यांचा मुलगा भूषण कुमार यांच्या हाती कंपनीची धुरा सोपावली.
हेही वाचा :
सर्वसामान्यांना दणका! टोमॅटोचे दर गगनाला भिडले
‘स्टायपेंडची भीक नको; हक्काच्या नोकऱ्या द्या; कर्नाटकात झाले ते महाराष्ट्रात घडेल का?
आधी सोबत दारू प्यायली, नंतर मित्रानेच मित्रावर चाकूने भोसकले अन्…