तुम्हाला बाळ होईल तेव्हा मी…, लग्नाचा उल्लेख करत सलमानचं वक्तव्य

मार्च महिन्यामध्ये गुजरातमधील जामनगर येथे झालेल्या प्री-वेडिंग सेरिमनीपासून (marriage)सुरु झालेला अनंत अंबानी आणि राधिका मर्चंड यांच्या विवाहसोहळ्यातील मुख्य दिवस 12 जुलै रोजी मुंबईमधील वांद्रे कुर्ला संकुलातील जीओ वर्ल्ड येथे पार पडला. याच दिवशी दोघांनी देव-ब्राम्हणांच्या साक्षीने सप्तपदी घेत वैवाहिक आयुष्याची सुरुवात केली.

आशियामधील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या रिलायन्सच्या मुकेश अंबानी(marriage) आणि निता अंबानी यांच्या धाटकट्या चिरंजीवांचा हा विवाहसोहळा केवळ देशातच नाही तर जगभरामध्ये चर्चेत होता. या विवाहसोहळ्यानंतर अंबानी कुटुंबीय या सोहळ्यातील काही उर्वरित कार्यक्रमांसाठी लंडन गेल्याचंही वृत्त आहे. असं असतानाच या लग्न सोहळ्याला आठवडा उलटून गेल्यानंतरही सेलिब्रिटींकडून अनंत आणि राधिका यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

खरं तर अनंत अंबानी आणि राधिका मर्चंड यांच्या विवाह सोहळ्यातील वेगवेगळ्या कार्यक्रमांना भारताबरोबरच परदेशातील अति महत्त्वाच्या व्यक्तींनी आवर्जून हजेरी लावल्याचं पाहायला मिळालं. डब्यूडब्यूई सुपस्टार जॉन सीनापासून ते ब्रिटनचे माजी पंतप्रधान बोरिस जॉन्सन आणि गायक जस्टीन बिबरपासून ते भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींपर्यंत अनेकांनी अनंत अंबानी आणि राधिका मर्चंड यांना शुभाशिर्वाद आणि शुभेच्छा देण्यासाठी जिओ वर्ल्डमध्ये हजेरी लावलेली.

जवळपास संपूर्ण बॉलिवूडच या सोहळ्याला केवळ पाहुणेच नाही तर अगदी घरच्या लग्नाप्रमाणे हजर होतं असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. या सोहळ्याला सलमान खान, शाहरुख खान, ऋतिक रोशन, अमिताभ बच्चन, रणवीर सिंह, दीपिका पादुकोण, आलिया भट्ट, रणबीर सिंह, ऐश्वर्या राय, प्रियंका चोप्रा यासारख्या नामवंत कलाकारांबरोबरच दाक्षिणात्य सिनेसृष्टीमधील रजनीकांत, रामचरण यासारखे कलाकारही आवर्जून उपस्थित होते.

लग्न सोहळ्यानंतर आता सोशल मीडियावरुन सेलिब्रिटींकडून अनंत आणि राधिका यांना लग्नानंतरच्या वैवाहिक आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या जात असतानाच बॉलिवडूचा भाईजान असलेल्या सलमानच्या हटके शुभेच्छांनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. सलमानने अनंत आणि राधिका यांच्या लग्नातील एक ब्लॅक अॅण्ड व्हाइट फोटो शेअर केला आहे. या फोटोत वधू आणि वर एकमेकांकडे हसत पाहताना दिसत आहेत.

हा फोटो जितका सुंदर आहे तितकीच सुंदर कॅप्शन(marriage) सलमानने या फोटोला दिली असून ती कॅप्शन चर्चेत आहे. “अनंत आणि राधिका, ‘मिस्टर आणि मीस अनंत अंबानी, तुम्हाला एकमेकांबद्दल आणि एकमेकांच्या कुटुंबाबद्दल वाटणार प्रेम मी स्वत: पाहिलं आहे. या विश्वानेच तुम्हाला एकत्र आणलं आहे. तुम्हाला सर्व सुख आणि आरोग्य लाभो या सदिच्छा. देव तुम्हाला दोघांचंही भलं करो!’ असं सलमान खानने इन्स्टाग्रामवर लिहिलेल्या कॅप्शनमध्ये म्हटलं आहे.

तसेच सलमानने शेवटच्या ओळीमध्ये अनंत आणि राधिका आई-वडील होतील त्यासंदर्भात एक रंजक वाक्य लिहिलेलं आहे. “तुम्ही जेव्हा पालक व्हाल तेव्हा आनंदाने नाचण्यासाठी मी फार उत्सुक आहे,” असं सलमानने म्हटलं आहे.

सलमानच्या या पोस्टवर त्याच्या अनेक चाहत्यांनी ‘भाई तुम्ही कधी लग्न करताय?’ असा प्रश्न विचारला आहे. सलमानने अनंत आणि राधिका यांच्यासाठी केलेल्या या पोस्टला चार दिवसांमध्ये 27 लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.

हेही वाचा :

अजितदादा-शरद पवार पुन्हा एकत्र येणार?, अजित पवार गटातील आमदाराचं सूचक विधान

सरकारची ‘लाडका मित्र’ योजना; मुंबईला अदानी सिटी करण्याचा डाव; ठाकरेंचा घणाघात

मगरीसोबतची मस्ती पडली महागात, जबडा उघडला आणि क्षणार्धात… Video Viral