आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपला मराठवाड्यात(minister) आणखी एक मोठा धक्का बसणार आहे. नांदेड जिल्ह्यातील माजी मंत्री डॉ. माधवराव किन्हाळकर आज शेकडो कार्यकर्त्यांसह शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश करणार आहेत. हा प्रवेश सोहळा शरद पवार यांच्या उपस्थितीत पिंपरी-चिंचवड येथे सायंकाळी ४ वाजता पार पडणार आहे. माधवराव किन्हाळकर यांचा नांदेडमध्ये तगडा जनसंपर्क असून, त्यांच्या पक्षप्रवेशामुळे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद आणखी वाढणार आहे.

काही दिवसांपूर्वी किन्हाळकर यांनी भाजपला(minister) सोडचिठ्ठी दिली होती. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे त्यांनी भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. ते लवकरच शरद पवार गटात प्रवेश करणार अशा चर्चा रंगल्या होत्या, ज्यांना आता पूर्णविराम मिळाला आहे.
विशेष बाब म्हणजे, काही दिवसांपूर्वी माजी केंद्रीय मंत्री सुर्यकांता पाटील यांनी भाजपाचा राजीनामा देऊन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला होता. त्यानंतर डॉ. माधवराव किन्हाळकर यांनी देखील भाजपला सोडचिठ्ठी दिली. त्यांच्या पाठोपाठ भाजपाचे उदगीर मतदारसंघाचे माजी आमदार सुधाकर भालेराव यांनीही भाजपला रामराम ठोकला.
माधवराव पाटील किन्हाळकर यांनी १० वर्षांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधून भाजपमध्ये प्रवेश केला होता, परंतु भाजपने त्यांना कोणतीही महत्वाची जबाबदारी दिली नाही. त्यामुळे किन्हाळकर नाराज असल्याचे बोलले जात होते.

माधवराव पाटील किन्हाळकर यांनी १९९१ ते १९९५ या कालावधीत शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र सरकारमध्ये गृह व्यवहार, महसूल आणि सहकार राज्यमंत्रीपद भूषवले होते. मात्र, त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. 2014 साली किन्हाळकर यांनी भोकर (विधानसभा मतदारसंघ) मधून अमिता अशोकराव चव्हाण यांच्या विरुद्ध भाजप उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती, परंतु त्यात पराभूत झाले होते.
हेही वाचा :
“तौबा-तौबा” पडले महागात; दिव्यांशचे दात तुटता-तुटता वाचले
लग्नाच्या दोन महिन्यानंतर अभिनेत्याला पत्नीने दुसऱ्या अभिनेत्रीसोबत रंगेहाथ पकडलं
“उत्तर प्रदेशात योगींच्या नेतृत्वावर भाजपमधील विरोधकांची सक्रियता; नेतृत्व बदलणे आव्हानात्मक”