शाळेची भिंत कोसळली, मुलं पहिल्या मजल्यावरून थेट.. थरारक VIDEO व्हायरल

गुजरातमधील वडोदरा येथील एका शाळेत धक्कादायक घटना घडली(viral) आहे. वडोदरा जिल्ह्यातील वाघोडिया रोड परिसरात असलेल्या नारायण शाळेच्या पहिल्या मजल्यावरील लॉबीचा काही भाग आणि भिंत कोसळली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल झाला आहे.

या दुर्घटनेत एक मुलगा जखमी झाला आहे. तर इमारतीच्या खाली(viral) ठेवलेल्या काही सायकल्सची मोडतोड झाली आहे. ही धक्कादायक घटना सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली आहे. या घटनेमुळे विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

व्हायरल व्हिडिओमध्ये दिसून येतंय की, लंचब्रेक सुरू असताना शाळेतील खोलीत काही विद्यार्थी जेवण करत होते. तर काही गप्पा मारत होते. सगळे जण आप-आपल्या धुंदीत असताना अचानक शाळेची लॉबी आणि भिंतीचा काही भाग कोसळतो.

कडेला बसलेले विद्यार्थी क्षणात यामुळे खाली कोसळतात. या घटनेमुळे पालकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेत आतापर्यंत 6 विद्यार्थी जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. या घटनेचा व्हिडीओ सध्या सगळीकडे व्हायरल होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शाळेची ही इमारत 14 ते 15 वर्षे जुनी असल्याची माहिती समोर येत आहे.

शाळेच्या व्यवस्थापनास इमारत जुनी असल्याचे माहिती असूनही कोणतीही कारवाई केलेली नसल्याचं देखील म्हटलं जातंय. यामुळे संताप व्यक्त केला जात आहे.

हेही वाचा :

कोल्हापूर : प्रकाश आंबेडकर यांची घोषणा: 25 जुलैपासून ओबीसी आरक्षण बचाव यात्रा

नागपूर जलमय! सहा तासांत विक्रमी 217.4 मिमी पावसाने जनजीवन ठप्प

वाळूज एमआयडीसी परिसरात धक्कादायक घटना तरुणाची गोळ्या झाडून हत्या