कोल्हापूर जिल्ह्यात पुढील तीन तासात मुसळधार पावसाचा इशारा

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात आज (21जुलै) पुढील तीन तासांसाठी हवामान(Kolhapur) विभागाकडून मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. गेल्या 24 तासात एकूण 28.4 मिमी पाऊस झाला असून काल दिवसभरात शाहूवाडी तालुक्यात सर्वाधिक 58.4 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली. जिल्ह्यातील राधानगरी धरणात 6.41 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. आज सकाळी 7 च्या अहवालानुसार राधानगरी धरणातून 1450 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे.

जिल्ह्यात 24 तासात पडलेला एकूण पाऊस मिमी मध्ये पुढीलप्रमाणे
हातकणंगले(Kolhapur)- 15.6 मिमी, शिरोळ -7.1 मिमी, पन्हाळा- 29.1 मिमी, शाहूवाडी- 58.4 मिमी, राधानगरी- 29.4 मिमी, गगनबावडा- 35.6 मिमी, करवीर- 21.8 मिमी, कागल- 24.7 मिमी, गडहिंग्लज- 25.6 मिमी, भुदरगड- 41.4 मिमी, आजरा- 42.2 मिमी, चंदगड- 36.2 मिमी असा एकूण 28.4 मिमी पाऊस पडल्याची नोंद आहे.

जिल्ह्यातील धरणांमध्ये पुढीलप्रमाणे पाणीसाठा
राधानगरी 6.41 टीएमसी, तुळशी 2.33 टीएमसी, वारणा 24.57 टीएमसी, दूधगंगा 14.70 टीएमसी, कासारी 1.96 टीएमसी, कडवी 2.33 टीएमसी, कुंभी 1.70 टीएमसी, पाटगाव 3.2 टीएमसी, चिकोत्रा 0.82 टीएमसी, चित्री 1.66 टीएमसी, जंगमहट्टी 1.22 टीएमसी, घटप्रभा 1.56 टीएमसी, जांबरे 0.82 टीएमसी, आंबेआहोळ 1.23 टीएमसी, सर्फनाला 0.48 टीएमसी व कोदे लघु प्रकल्प 0.21 टीएमसी इतका पाणीसाठा आहे.

बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे
राजाराम 36.11 फूट, सुर्वे 35 फूट, रुई 64.11 फूट, इचलकरंजी 60.9 फूट, तेरवाड 53.9 फूट, शिरोळ 45.9 फूट, नृसिंहवाडी 44 फूट, राजापूर 33.5 फूट तर नजीकच्या सांगली 17.3 फूट व अंकली 21.8 फूट अशी आहे.

हेही वाचा :

शाळेची भिंत कोसळली, मुलं पहिल्या मजल्यावरून थेट.. थरारक VIDEO व्हायरल

कर्मचाऱ्यांच्या कामाची वेळ 14 तास होणार? आयटी कंपन्यांच्या प्रस्तावावर सरकार निर्णय घेणार

कोल्हापुरातील शाळेच्या परिसरात विद्यार्थ्यांवर माकडाच्या कळपाचा हल्ला