अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि अभिनेता झहीर इक्बाल यांनी गुपचूप लग्न(be my guest) केल्यानंतर आता त्यांच्या लग्नाला एक महिना पूर्ण झाला आहे. वांद्रे येथील घरात फार कमी पाहुण्यांच्या उपस्थितीत सोनाक्षी – झहीर यांनी रजिस्टर्ड पद्धतीत लग्न केले होते. लग्नानंतर दोघांच्या धर्मामुळे काही वाद निर्माण झाले होते, पण सोनाक्षी आणि झहीर यांनी त्याकडे दुर्लक्ष करून त्यांच्या प्रेमाला महत्त्व दिले.
सध्या सोशल मीडियावर दोघांचा एक व्हिडीओ(be my guest) तुफान व्हायरल होत आहे, ज्यामध्ये झहीर आपल्या पत्नी सोनाक्षीची काळजी घेताना दिसत आहेत. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. व्हिडीओतील सोनाक्षी – झहीर यांची केमिस्ट्री चाहत्यांना प्रचंड आवडली आहे.
व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकरी सोनाक्षीला ‘प्रेग्नेंट आहेस का?’ असे विचारत आहेत. एक नेटकरी म्हणाला, ‘सोनाक्षी प्रेग्नेंट आहे का?’ तर दुसरा म्हणाला, ‘लवकरच नवा पाहुणा येणार आहे.’ अन्य एक नेटकरी म्हणाला, ‘बेबी बम्प दिसत आहेत वाटतं…’ अशा कमेंट्स करत सध्या सोशल मीडियावर सोनाक्षी – झहीर यांच्या चर्चेला उधाण आले आहे.
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सोनाक्षीने प्रेग्नेंसीच्या चर्चांबाबत भाष्य केले होते. ती म्हणाली, ‘लग्नाआधीच माझं आयुष्य सेट असल्यामुळे मी आनंदी आहे. लग्नानंतर फक्त मी रुग्णालयात जाऊ शकत नाही कारण लगेच प्रेग्नेंसीच्या चर्चा होतात. फक्त एवढाच फरक लग्नानंतर आयुष्यात झाला आहे.’
सोनाक्षी – झहीर यांच्या लग्नानंतर सोनाक्षीने अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिच्या हॉटेलमध्ये रिसेप्शन पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीमध्ये अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते. पार्टीचे व्हिडीओ आणि फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. आता लग्नानंतर सोनाक्षी ‘ककूडा’ या हॉरर सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे.
हेही वाचा :
जंक फूड खाल्ल्याने मुलांना होत आहेत हे धोकादायक आजार
सरकारी योजनेच्या नावाने फसवणूक: महिलेचे दागिने पळविले
रत्नागिरी: मुंबई-गोवा महामार्गावरील खेड जगबुडी नदीवरील पुलाला मोठे भगदाड