हार्दिक पांड्या हा गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असणारं एक नाव आहे. हार्दिक पांड्याची(sports) सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. हार्दिक पांड्या याच्या आयुष्यात सध्या अनेक मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. हार्दिक पांड्याने त्याच्या पत्नीसोबत घटस्फोट घेतलाय. मॉडेल नताशा स्टॅनकोविक आणि हार्दिक पांड्याचा घटस्फोट झाला आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांनी वेगळं होत असल्याची माहिती दिली.
नताशा स्टॅनकोविक हिने हार्दिकचे घर सोडल्याचीही जोरदार चर्चा रंगताना(sports) दिसली. शेवटी सर्व चर्चांना पूर्णविराम देत यांनी नातं संपल्याचं सांगितलं. ही पोस्ट सोशल मीडियावर शेअर करण्याच्या अगोदर नताशा स्टॅनकोविक हिने भारत सोडला आहे.
हार्दिक पांड्या याने काही दिवसांपूर्वीच एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्याने नताशाबद्दल खुलासा केला होता. हार्दिक पांड्या म्हणाला की, एका पार्टीमध्ये रात्री 1 वाजता मी आणि नताशा हे एकमेकांना भेटलो. ज्यावेळी तिने मला बघितलं, त्यावेळी मी गळ्यात मोठी चैन, हातात घड्याळ अशा अवस्थेत तिथे पोहोचलो होतो.
हार्दिक म्हणाला, नताशाला माहिती पण नव्हतं मी कोण आहे आणि काय करतो. त्यानंतर आम्ही एकमेकांसोबत वेळ घालवला. मी नताशाच्या आणि माझ्या नात्याबद्दल माझ्या घरच्यांनाही सांगितलं नव्हतं. मी माझ्या भावाला दोन दिवस अगोदर सांगितलं होतं की, असं कोणी मिळालं ज्याच्यासोबत मी आयुष्यभर राहिल.
2020 मध्ये हार्दिकने फिल्मी स्टाइलने नताशाला प्रपोज केलं. अचानक त्यांनी इन्स्टाग्रामवर आपल्या लग्नाचे फोटो शेअर केले. दोघांच्याही चाहत्यांना धक्का बसला. त्यांनी 2020 मध्ये कोर्ट मॅरेज केलं मात्र याविषयी ऑफिशिअली सांगितलं नाही. अचानक नताशाची प्रेग्नंटची बातमी समोर आली. तेव्हा लग्नाआधीच प्रेग्नंवरुन ती बरीच ट्रोल झाली होती.
हार्दिक आणि नताशाला एक मुलगा असून त्याचं अगस्त्य आहे. 2023 मध्ये हार्दिक आणि नताशाने पुन्हा एकदा लग्न केलं. यावेळी त्यांनी ख्रिश्चन पद्धतीनं लग्न केलं. त्यानंतर आणखी एकदा त्यांनी लग्न केलं. एकूण हार्दिक आणि नताशाने तीन वेळेस लग्न केलं. त्यांचे हे फोटो खूप व्हायरल झाले होते.
हेही वाचा :
जंक फूड खाल्ल्याने मुलांना होत आहेत हे धोकादायक आजार
मुलांची बुद्धी तल्लख करण्यासाठी आहारात समाविष्ट करावेत ‘हे’ पदार्थ..
सरकारी योजनेच्या नावाने फसवणूक: महिलेचे दागिने पळविले