पुणे शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारीचे प्रमाण वाढताना दिसत आहे. रस्ते वाहतुकीच्या(driver) नियमांबाबत पुणे नेहमीच बदनाम राहिला आहे. मात्र चारचाकी किंवा दुचाकी चालवणे, पार्किंग यासारख्या किरकोळ कारणांवरुन मोठमोठे वाद घडत असल्याचं पाहायला मिळत आहे. पुण्यातील बाणेर पाषाण रस्त्यावर एका महिलेने जाण्यासाठी वाट नाही दिली, म्हणून चक्क तिला बेदम मारहाण करुन रक्तबंबाळ केल्याची धक्कादायक घटना घडल्याचं समोर आलं आहे.
संबंधित महिलेने त्या अवस्थेतच आपला व्हिडिओ तयार केला आणि घडलेली घटना व्हिडिओच्या(driver) माध्यमातून सर्वांना सांगितली. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी पुणे पोलिसांवर प्रचंड रोष व्यक्त केला आहे.
जेरलीन डिसिल्व्हा असं मारहाणीच्या घटनेत गंभीर जखमी झालेल्या महिलेचं नाव आहे. तर स्वप्नील केकरे असं आरोपीचं नाव आहे. या प्रकरणी चतुःश्रुंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीसोबतच त्याच्या पत्नीलाही सहआरोपी केलं आहे.
पुण्यात राहणारी जेरलीन डिसिल्व्हा ही महिला २० जुलै रोजी तिच्या दोन मुलांसोबत बाणेर पाषाण रस्त्यावरून दुचाकीवर जात होती. त्याच वेळी आरोपी स्वप्निल केकरे आणि त्याची पत्नी चारचाकीने प्रवास करत होते. स्वप्नील त्यांच्या दुचाकीला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करत होता, मात्र जेरलीन त्याला जागा देत नव्हती.
या दरम्यान दोघांचा वाद झाला आणि स्वप्नीलचा पारा चढला. त्याने जबरदस्ती ओव्हरटेक करून चारचाकी आडवी घातली, गाडीतून बाहेर येत त्याने जेरलीनच्या केसांना धरुन तिच्या नाका तोंडावर दोन बुक्क्यांचा मार दिल्याचा आरोप आहे. त्यामुळे जेरलीन अक्षरशः रक्तबंबाळ झाली. तिने त्याच अवस्थेत व्हिडिओ तयार करत आपली व्यथा मांडली. या प्रकरणी चतुःश्रुंगी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस करत आहेत. मात्र सर्वसामान्य नागरिकांमध्ये या घटनेमुळे घबराट पसरली आहे.
हेही वाचा :
चित्रपट काढण्याची भाषा प्रत्यक्षात बिन पैशाचा तमाशा
तोडगा निघणार! आरक्षणाचा मुद्दा तोडीस नेण्यासाठी पवार मैदानात; CM शिंदेंची भेट घेणार
रविंद्र जडेजासाठी भारतीय संघाची दारं कायमची बंद?