छोट्या पडद्यावर प्रचंड लोकप्रिय असणारा ‘बिग बॉस’ हा कार्यक्रम घराघरात(politics) पाहिला जातो. किशोरवयीन मुलंदेखील या कार्यक्रमाचे चाहते आहेत. महिन्याभरापूर्वी ‘बिग बॉस ओटीटी ३’ हा कार्यक्रम ओटीटीवर सुरू झाला असून, प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद लाभत आहे. मात्र, यातील एका व्हिडिओने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे आणि सोशल मीडियावर टीकेचा धनी झाला आहे.
या वादग्रस्त व्हिडिओत घरातील सदस्य अरमान मलिक आणि त्याची दुसरी पत्नी कृतिका मलिक यांच्या अश्लील चाळ्यांचे दृश्य दाखवण्यात आले होते. यावर आक्रमक होत शिंदे गटाच्या आमदार(politics) मनीषा कायंदे यांनी ‘बिग बॉस ओटीटी ३’ कार्यक्रम बंद करण्याची आणि त्याच्या निर्मात्यांविरोधात कारवाई करण्याची मागणी केली आहे.
मनीषा कायंदे यांनी मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्याकडे एका पत्राद्वारे ही मागणी केली आहे. या पत्रात त्यांनी लिहिले, “मागील काही दिवसांपासून वादग्रस्त ठरत असलेल्या ‘बिग बॉस सीजन ३’ या रियालिटी शोचे प्रक्षेपण २१ जून पासून सुरू झाले आहे. दररोज रात्री ९ वाजता ओटीटीवर त्याचे प्रसारण होत आहे. दिवसेंदिवस लोकप्रिय होत असलेल्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर दररोज लाखो कुटुंबीय सदर शो पाहत असतात. मात्र काल, १८ जुलै २०२४ रोजी रात्री प्रसारित करण्यात आलेल्या शोमध्ये कलाकार कॅमेरासमोर अतिशय बिभत्स / किळसवाणे कृत्य करताना दाखवण्यात येत होते.”
मनीषा कायंदे यांनी पुढे लिहिले, “अरमान मलिक व कृतिका मलिक या कलाकारांनी कौटुंबिक नात्यांच्या सर्व सीमा पार करत व सामाजिक मूल्यांची वाट लावत शरमेने मान खाली जाईल असे कृत्य केले आहे. सदर प्रकार अत्यंत दुर्दैवी असून अशा प्रकारे चित्रीकरण व प्रक्षेपण करणाऱ्या सर्व संबंधितांवर तातडीने योग्य कलमान्वये कारवाई व्हावी व सदर किळसवाणा शो बंद व्हावा याकरिता अनेकांनी आवाज उठवला आहे. तरी, ‘बिग बॉस सीजन ३’ सारख्या वादग्रस्त रियालिटी शोबाबत निर्माते, कलाकार व प्रक्षेपक यांच्यावर कारवाई करण्यात यावी.”
मनीषा कायंदे यांनी कार्यक्रमाच्या निर्मात्यांना विचारले आहे, “तुम्ही हे जे करत आहात ते योग्य आहे का?” या प्रकरणामुळे ‘बिग बॉस ओटीटी ३’ वर पुढे काय कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा :
तोडगा निघणार! आरक्षणाचा मुद्दा तोडीस नेण्यासाठी पवार मैदानात; CM शिंदेंची भेट घेणार
ओव्हरटेक करु न दिल्याचा राग, कार चालकाने दुचाकीस्वार महिलेचं नाक फोडलं Video
सुष्मिता सेन आणि एक्स बॉयफ्रेंड रोहमन शॉल पुन्हा दिसले सोबत; चाहते म्हणाले ब्रेकअपनंतर…