श्रीलंका दौऱ्याआधी भारताच्या अष्टपैलू खेळाडूने उरकला साखरपुडा

भारतीय क्रिकेट संघ श्रीलंकेला रवाना झाला आहे. नवे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर(tour) यांच्या नेतृत्वाखाली कर्णधार सूर्यकुमार यादवसह टी-20 मालिकेतील खेळाडू श्रीलंकेला रवाना झाले आहेत. भारतीय संघाला श्रीलंकेत तीन सामन्यांची टी-20 मालिका आणि एकदिवसीय मालिका खेळायची आहे. याचदरम्यान भारताच्या अनकॅप्ड खेळाडूने साखरपुडा केला आहे.

अष्टपैलू खेळाडू ललित यादवने साखरपुडा केल्याची(tour)माहिती समोर आली आहे. ललित यादव आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून खेळतो. ललित यादवने साखरपुड्याचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ललितच्या भावी पत्नीचे नाव मुस्कान यादव आहे. फोटोच्या कॅप्शनमध्ये ललितने अंगठीच्या इमोजीसह साखरपुडा झालेल्या दिवसाची तारीख लिहिली आहे.

ललित यादव 2020 पासून आयपीएलचा भाग आहे. ललित यादवने 2021 मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण केले. तो सुरुवातीपासूनच दिल्ली कॅपिटल्सचा भाग होता. 2020 मध्ये दिल्लीने ललितला पहिल्यांदा 20 लाख रुपयांना विकत घेतले. यानंतर दिल्लीने 2022 च्या मेगा लिलावात ललितला 65 लाख रुपयांना संघात घेतले.

ललित यादवने आतापर्यंत आयपीएलमध्ये 27 सामने खेळले आहेत. या सामन्यांच्या 21 डावांमध्ये, त्याने 19.06 च्या सरासरीने आणि 105.17 च्या स्ट्राइक रेटने 305 धावा केल्या आहेत, ज्यामध्ये त्याची सर्वोच्च धावसंख्या 48 आहे. याशिवाय 19 डावांमध्ये गोलंदाजी करताना ललित यादवने 42.5 च्या सरासरीने 10 विकेट्स घेतल्या आहेत, ज्यामध्ये त्याचा सर्वोत्तम आकडा 2/11 आहे.

ललित यादवची प्रथम श्रेणीतील कामगिरी-
ललित यादवने आतापर्यंत 19 प्रथम श्रेणी, 41 लिस्ट-ए आणि 82 टी-20 सामने खेळले आहेत. प्रथम श्रेणीमध्ये त्याने 951 धावा केल्या आहेत आणि 15 बळी घेतले आहेत. याशिवाय त्याने लिस्ट-ए मध्ये 927 धावा केल्या आहेत आणि 42 विकेट्सही आपल्या नावावर केल्या आहेत. उर्वरित T20 मध्ये त्याने 1077 धावा केल्या असून 53 धावा केल्या आहेत.

भारताच्या श्रीलंका दौऱ्याचे पूर्ण वेळापत्रक-
27 जुलै – 1ली टी-20 (पल्लेकेले)

28 जुलै – दुसरी टी-20 (पल्लेकेले)

30 जुलै – तिसरी टी-20 (पल्लेकेले)

2 ऑगस्ट – पहिली वनडे (कोलंबो)

4 ऑगस्ट – दुसरी वनडे (कोलंबो)

7 ऑगस्ट – तिसरी एकदिवसीय (कोलंबो)

सोनी स्पोर्ट्स नेटवर्क चॅनेलवर टीव्हीवर भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन सामन्यांची टी-20 मालिका तुम्ही पाहू शकाल. तर मोबाईलवर सामना पाहणाऱ्या प्रेक्षकांना सोनी लाइव्ह ॲपवर ही मालिका पाहता येणार आहे. ही मालिका हिंदी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांमध्ये प्रसारित होणार आहे. मोबाईलवर सामना पाहण्यासाठी तुम्हाला सोनी लाईव्हचे सदस्यत्व घ्यावे लागेल.

हेही वाचा :

मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; उपोषणाचा आज तिसरा दिवस

अखेर कोल्हापूरला पुराने वेढलं! तब्बल ७८ बंधारे पाण्याखाली; ‘पंचगंगेने’ इशारा पातळी ओलांडली

‘महिन्यातून 2 ते 3 वेळा तरी मी बॉयफ्रेंडसोबत…’, Janhvi Kapoor चा धक्कादायक खुलासा