कोल्हापूर: गेल्या २४ तासांपासून कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे(highways) पंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. नदीची पातळी ४३.१ फुटांवर पोहोचली असून कोल्हापुर शहरावर पुराचे संकट कोसळण्याची शक्यता आहे. प्रशासनाने संपूर्ण जिल्ह्याला सतर्कतेचा इशारा दिला आहे.
पंचगंगेने धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे(highways), जिल्ह्यातील ८३ बंधारे पाण्याखाली गेले आहेत आणि धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरूच आहे. कोल्हापूर रत्नागिरी राज्य मार्गावर पाणी आल्यामुळे प्रशासनाने हा मार्ग बंद केला आहे.
राधानगरी धरण ९६ टक्के भरले असून, पावसाचा जोर कायम राहिल्यास धरणाचे तीन स्वयंचलित दरवाजे कोणत्याही क्षणी उघडण्याची शक्यता आहे. यामुळे विसर्ग १५०० क्युसेकवरून वाढून ५८०० क्युसेकपर्यंत होण्याची शक्यता आहे. नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
पंचगंगा नदीच्या धोक्याच्या पातळी ओलांडल्यामुळे शहरातील नागरिक पुराच्या संकटामुळे चिंतित आहेत. 2019 आणि 2021 मधील पुराचे नुकसान लक्षात घेता नागरिकांनी खबरदारी घेऊन आपली चारचाकी वाहने उंचावर लावली आहेत. न्यू पॅलेस आणि महावीर कॉलेज परिसरातील नागरिकांनी याप्रकारे उपाययोजना केली आहे.
हेही वाचा :
शोधलेस तू “मानवा”, वास्तव आहे की, नुसतीच हवा ?
अर्थमंत्र्यांची एक घोषणा, अन् रतन टाटांची कंपनी मालामाल; गुंतवणूकदारांचीही चांदी!
‘…तर वर्षातले 300 दिवस क्रिकेट तुला रडवेल’; शमीला पाकिस्तानी क्रिकेटरचा ‘श्राप’