भारतीय क्रिकेट संघाच्या माजी खेळाडू गौतम गंभीरच्या मुख्य प्रशिक्षकपदी नेमणूक झाल्यानंतर रोहित शर्मा(Rohit Sharma)आणि विराट कोहली यांच्या भवितव्याबाबत चर्चेला वेग आला आहे. गंभीरने त्यांच्या क्रिकेट भवितव्याबद्दल विचार मांडला आहे, विशेषतः 2027 च्या एकदिवसीय वर्ल्डकपसाठी.
गौतम गंभीरने पत्रकार परिषदेत सांगितले की, रोहित(Rohit Sharma) आणि विराट यांना अद्याप बरंच क्रिकेट खेळायचं आहे आणि त्यांच्या सध्याच्या प्रदर्शनावरून ते 2027 च्या वर्ल्डकपसाठी उपलब्ध असू शकतात. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी रोहित शर्मा आयसीसी चॅम्पिअन्स ट्रॉफी आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पिअनशिपमध्ये नेतृत्व करणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
मात्र, पूर्वी गौतम गंभीरने असा दावा केला होता की, टी-20 मध्ये चांगली कामगिरी न करणाऱ्या वरिष्ठ खेळाडूंना संघात स्थान मिळणार नाही. माजी क्रिकेटपटू के श्रीकांत यांनी गंभीरच्या या वक्तव्याची आठवण करून देत गंभीरच्या “यू-टर्न” संदर्भात टीका केली आहे.
श्रीकांत म्हणाले की, “गौतम गंभीरने यू-टर्न घेतला आहे. 2024 च्या टी-20 विश्वचषकापूर्वी तो म्हणत होता की, विराट आणि रोहित कामगिरी करण्यात अपयशी ठरले तर त्यांना संघात स्थान नसेल. पण आता तो त्याच खेळाडूंना 2027 च्या विश्वचषकासाठी फिट मानत आहे.”
विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या 2027 च्या एकदिवसीय वर्ल्डकपसाठी उपलब्धतेवर विचार करतांना श्रीकांतने कोहलीच्या फिटनेसचा उल्लेख करत सांगितले की, त्याची उपस्थिती शक्य आहे, परंतु रोहितला वयाच्या 40 व्या वर्षी खेळणे कठीण होईल. 2027 चा एकदिवसीय वर्ल्डकप आफ्रिकेत आयोजित केला जाईल, ज्यात दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबिया संयुक्तपणे आयोजन करणार आहेत.
हेही वाचा :
शोधलेस तू “मानवा”, वास्तव आहे की, नुसतीच हवा ?
‘स्त्री २’ मधील ‘आज की रात’ गाणं रिलीज, तमन्ना भाटियाच्या अदांवर ‘चंदेरी’वासी फिदा…
आज ‘या’ 5 राशींचं नशीब पालटणार, इच्छित गोष्टी साध्य होणार