राज्यात पुढील चार दिवस दमदार पाऊस! कुठल्या जिल्ह्यांना रेड अलर्ट

गेले चार दिवस पावसाने(Heavy rain)राज्यातील विविध भागांत दमदार बॅटिंग केली आहे. यातच आता हवामान विभागाने महाराष्ट्रातील काही भागांत पुढील चार दिवसांसाठीही अतिवृष्टी होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. येत्या काही तासांसाठी हवामान विभागानं राज्यातील सहा जिल्ह्यांना रेड अलर्ट तर, ७ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे.

गेल्या काही दिवसांपासून पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात मुसळधार पाऊस (Heavy rain)सुरू आहे. विशेषत: पुणे जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्याचे परिणामही अनेक परिसरात दिसून आले. मुसळधार पावसामुळे पुणे जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. धरणे, ओढे, नद्या भरुन वाहू लागल्या आहेत. पुपुणे शहरात अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे.

ठाणे, रायगड साताऱ्यातही अशीच परिस्थिती आहे. परिणाम पावसानं असा जोर धरला असतानाच हवामान विभागानं आणखी एक टेन्शन वाढवणारा अलर्ट जारी केला. हवामान विभागाकडून मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, रायगड, पुणे, सातारा या जिल्ह्यांसाठी पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. तर, पालघर, अहमदनगर, रत्नागिरी, धाराशिव, लातूर, परभणी, नांदेड या 7 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

तसेच कोकणातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली. मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये घाट भागातील तुरळक ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

हेही वाचा :

शोधलेस तू “मानवा”, वास्तव आहे की, नुसतीच हवा ?

‘स्त्री २’ मधील ‘आज की रात’ गाणं रिलीज, तमन्ना भाटियाच्या अदांवर ‘चंदेरी’वासी फिदा…

आज ‘या’ 5 राशींचं नशीब पालटणार, इच्छित गोष्टी साध्य होणार