टॉलिवूड अभिनेत्री साई पल्लवी हिने आपल्या दिलखेचक अदाकारींमुळे(Dating) प्रेक्षकांवर भुरळ पाडली आहे. साई पल्लवी टॉलिवूडसोबतच बॉलिवूडमध्येही आपल्या निखळ सौंदर्यामुळे चर्चेत असते. गेल्या काही दिवसांपासून साई ‘रामायण’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. पण सध्या साई तिच्या आगामी चित्रपटामुळे नाही तर, तिच्या खासगी लाईफमुळे चर्चेत आली आहे. तमिळ मीडियाने दिलेल्या एका माहितीमुळे सगळ्यांनाच धक्का बसला आहे.
अनेक मिडिया रिपोर्ट्सनुसार, अभिनेत्री साई पल्लवी एका विवाहित अभिनेत्याला(Dating) डेट करत आहे. या बातमीमुळे आता साई पल्लवीचे चाहते भलतेच चिंतेत पडले आहेत. त्या विवाहित अभिनेत्यासोबत साई पल्लवी रिलेशनशिपमध्ये असल्याचेही बोलले जात आहे. सिनेजोशच्या रिपोर्टनुसार, साई पल्लवी एका विवाहित अभिनेत्यासोबत रिलेशनशिपमध्ये आहे. या बातमीमुळे सर्वच चिंतेत पडले आहेत. त्याशिवाय त्याला दोन मुलंही आहेत. दरम्यान, ही बातमी किती खरी आणि किती खोटी याबद्दल कोणतीही माहिती नाही. हे वृत्त सोशल मिडियावर तुफान व्हायरल होत असून या वृत्तावर कोणाचाच विश्वास बसत नाही.
साईच्या या रिलेशनशिपच्या वृत्ताने सर्वांनाच धक्का बसला आहे. मात्र, असं असलं तरीही साई पल्लवीच्या पीआर टीमकडून याबद्दल कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. शिवाय, अभिनेत्रीकडूनही कोणतंच स्पष्टीकरण मिळालेलं नाही. त्यासोबतच तिच्या कुटुंबीयांनीही या चर्चांवर भाष्य केलेले नाही. चाहते साईच्या उत्तराची आतुरतेने वाट पाहत आहेत. साईने अभिनयासोबतच आपल्या डान्स स्किलच्या जोरावर स्वत:ची एक वेगळी ओळख तयार केलेली आहे. साईनं तेलुगू, तमिळ आणि केरळ चित्रपटसृष्टीत कमालीचं काम केलं आहे.
साई पल्लवीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर, रणबीर कपूरसोबत ‘रामायण’ चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. रणबीर प्रभु श्री रामाच्या तर साई पल्लवी देवी सीतेच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन नितेश तिवारी करणार आहे. सध्या दोघेही चित्रपटाच्या शुटिंगमध्ये व्यग्र आहेत.
हेही वाचा :
कोल्हापुरला वाचवण्यासाठी सतेज पाटलांनी गाठले कर्नाटक
कोल्हापूर : ‘पंचगंगे’ने धोक्याची पातळी ओलांडली, ८३ बंधारे, १० राज्यमार्ग पाण्याखाली
‘…तर वर्षातले 300 दिवस क्रिकेट तुला रडवेल’; शमीला पाकिस्तानी क्रिकेटरचा ‘श्राप’