भारतीय क्रिकेट संघाचा जलदगती गोलंदाज मोहम्मद शमी मटण खाल्ल्याशिवाय(friend) राहूच शकत नाही असा खुलासा त्याचा अत्यंत जवळचा मित्र उमेश कुमारने केला आहे. जर मोहम्मद शमीने रोज एक किलो मटण खाल्लं नाही, तर त्याचा गोलंदाजीचा वेग ताशी 15 किमीने कमी होईल असंही त्याने उपहासात्मकपणे म्हटलं आहे. शुभांकर मिश्राच्या युट्यूब चॅनेलवर बोलताना उमेश कुमारने हा खुलासा केला.
“जर त्याने (मोहम्मद शमी) रोज एक किलो मटण(friend) खाल्लं नाही, तर त्याचा गोलंदाजीचा वेग ताशी 15 किमीने कमी होईल.” असं उमेश कुमारने सांगितलं. पॉडकास्टमध्ये त्याने मोहम्मद शमी जास्तीत जास्त एक दिवस मटणाशिवाय राहू शकतो असाही खुलासा केला.
“मोहम्मद शमी काहीही सहन करु शकतो, मात्र मटणाशिवाय जगू शकत नाही. तो एक दिवसासाठी सहन करु करतो. दुसऱ्या दिवशी तो निषेध करेल आणि तिसऱ्या दिवशी तर वेडापिसा होईल,” असं उमेश कुमारने सांगितलं.
मोहम्मद शमी एकदिवसीय वर्ल्डकपमध्ये मैदानावर अखेरचा दिसला होता. एकदिवसीय वर्ल्डकपमध्ये त्याने आपल्या स्फोटक गोलंदाजीने अक्षरश: वादळ आणलं होतं. 7 सामन्यात 24 विकेट घेत तो सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला होता. मात्र दुखापतीमुळे तो क्रिकेटपासून सध्या दूर आहे.
मोहम्मद शमीला शॉपिंगची फार आवड असल्याचंही यावेळी उमेश कुमारने सांगितलं. मालिकेनंतर घऱी असताना त्याला जेव्हा शक्य असेल तेव्हा मॉलमध्ये जायला फार आवडतं असं उमेश कुमार म्हणाला. “मोहम्मद शमीला शॉपिंगची फार आवड आहे. दिल्लीत एम्पोरिओ नावाचा एक मॉल आहे. याआधी जेव्हा कधी शमी घऱी यायचा, तेव्हा शॉपिंगला मला सोबत नेत असे,” असं उमेश कुमार म्हणाला.
मोहम्मद शमी गुडघ्याच्या दुखापतीमुळे सध्या संघाबाहेर आहे. दुखापतीमुळेच तो टी-20 वर्ल्डकप खेळू शकला नाही. मोहम्मद शमी संघात कधी परतणार यावर मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर याने पत्रकार परिषदेत सांगितलं होतं. “त्याने गोलंदाजी करण्यास सुरुवात केली आहे. पहिला कसोटी सामना 19 सप्टेंबरला आहे. आमचं नेहमी तेच लक्ष्य होतं (तोपर्यंत त्याने कमबॅक करावं). तोपर्यंत तो संघाकडून खेळण्यासाठी पूर्णपणे फिट आहे की नाही यासंदर्भात मला एनसीएमध्ये चर्चा करावी लागेल.” असं गौतम गंभीरने सांगितलं.
हेही वाचा :
शिराळ्यातील शेतकऱ्यांच्या ५७ वर्षांच्या प्रश्नावर तोडगा निघाला
नव्या जर्सीमध्ये टीम इंडिया, BCCI चा मोठा निर्णय, चाहते म्हणाले “अभिमानास्पद क्षण”
दहा दिवसांच्या बाळासह मातेची पुरात अडचण, प्रशासनाच्या मदतीची प्रतीक्षा