मनोरंजनसृष्टीला हादरवणारी एक दुर्देवी घटना ब्राझीलमध्ये घडली आहे, जिथे प्रसिद्ध गायक आयरेस सासाकी आणि त्याचा चाहता स्टेजवर विद्युतप्रवाहाच्या झटक्याने मरण पावले.
नेमकं घडलं काय? ३५ वर्षीय आयरेस सासाकी सॅलिनोपोलिस येथील सोलार हॉटेलमध्ये एका कॉन्सर्टमध्ये सहभागी झाला होता. या कॉन्सर्टमध्ये आयरेस स्टेजवर परफॉर्म करत असताना, एक ओल्या चिंब झालेल्या चाहत्याने त्याला मिठी मारली. याच वेळी गिटारसाठी लावलेल्या वायरमधून विद्युतप्रवाह आला आणि या दोघांचा जागीच मृत्यू झाला. आयरेस सासाकीचं जवळपास वर्षभरापूर्वीच लग्न झालं होतं.
रिटा माटोस, आयरेसची चुलती, जी या कार्यक्रमाला उपस्थित होती, स्थानिक वृत्तसंस्थेशी बोलताना म्हणाली, “आम्ही आयरेससोबत असलेल्या लोकांकडून नेमकं काय घडलं हे समजून घेत आहोत. आम्ही सर्व माहिती घेऊनच एक पत्रक जारी करणार असून ते प्रसारमाध्यमांना देणार आहोत.” सॅलिनोपोलिस पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत, आणि भिजलेल्या चाहत्यामुळे या प्रकरणाचं गूढ वाढलं आहे.
हॉटेलचं म्हणणं काय?
सोलार हॉटेलने जारी केलेल्या पत्रकामध्ये, “आम्ही त्याच्या कुटुंबाला मदत करण्याचा निर्णय घेतला असून आवश्यक त्या सर्व गोष्टी आम्ही करत आहोत. आम्ही या प्रकरणाच्या तपासासंदर्भात यंत्रणांना पूर्ण सहकार्य करत असून हवी ती माहिती देत आहोत,” असं हॉटेलने इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेल्या पत्रात म्हटलं आहे.
मृत्यूच्या काही मिनिटांपूर्वीचा व्हिडीओ धक्कादायक बाब म्हणजे मृत्यूच्या काही मिनिटांपूर्वीचा व्हिडीओ स्वत: आयरेसनेच पोस्ट केला होता. हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.
आयरेसची पत्नी मारिनाने इन्स्टाग्रामवर लिहिलेल्या पोस्टमध्ये, “मला मेसेज केलेल्या प्रत्येकाचे मी आभार मानते. तुम्ही दाखवलेलं प्रेम आणि सहानुभूतीसाठी मी आभारी आहे. आमच्या या कठीण काळात आमच्या पाठीशी उभे राहणाऱ्यांचे आभार मानते,” असं म्हटलं आहे.
हेही वाचा :
शिराळ्यातील शेतकऱ्यांच्या ५७ वर्षांच्या प्रश्नावर तोडगा निघाला
नव्या जर्सीमध्ये टीम इंडिया, BCCI चा मोठा निर्णय, चाहते म्हणाले “अभिमानास्पद क्षण”
दहा दिवसांच्या बाळासह मातेची पुरात अडचण, प्रशासनाच्या मदतीची प्रतीक्षा