भारताचा पासपोर्ट जगात किती स्ट्राँग आहे? किती देशात भारतीयांना(passport) व्हिजा फ्रि एन्ट्री मिळते? शक्तिशाली पासपोर्ट असणाऱ्या देशांच्या यादीत भारताचा नंबर कितवा आहे? अशा प्रश्नांची उत्तरं मिळाली आहेत. भारताने पासपोर्ट रँकिंगमध्ये मोठी झेप घेतली आहे. जागतिक पासपोर्ट इंडेक्स मध्ये भारताचा नंबर 82 पर्यंत पोहोचला आहे.
भारतीय नागरिकांना आता जगातील 52 देशांत व्हिजा फ्री एन्ट्री(passport) मिळणार आहे. यामध्ये इंडोनेशिया, मलेशिया, थायलँड यांसारख्या पर्यटनाच्या दृष्टीने प्रसिद्ध असणाऱ्या देशांचा समावेश आहे. हेनले पासपोर्ट इंडेक्सच्या नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या क्रमवारीत भारताचा पासपोर्ट 82 व्या क्रमांकावर राहिला आहे. ही क्रमवारी इंटरनॅशनल ट्रान्सपोर्ट असोसिएशन (IATA) च्या आकडेवारीवर आधारीत आहे.
या क्रमवारीत सिंगापूरचा पासपोर्ट जगातील सर्वाधिक शक्तिशाली पासपोर्ट म्हणून पुन्हा अव्वल क्रमांकावर राहिला आहे. या इंडेक्सनुसार सिंगापूरने रेकॉर्ड स्कोअर स्थापित केला आहे. या देशातील नागरिक आता जगातील 227 पैकी 195 देशांत व्हिजा फ्री एन्ट्री करू शकतात. फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान आणि स्पेन संयुक्तपणे दुसऱ्या क्रमांकावर आहेत. या देशांच्या पासपोर्टवर त्यांच्या देशातील नागरिक 192 देशांत व्हिजा फ्री एन्ट्री मिळवू शकतात.
या व्यतिरिक्त ऑस्ट्रिया, फिनलंड, आयर्लंड, लेक्झेंबर्ग, नेदरलँड्स, दक्षिण कोरिया आणि स्वीडन या देशांचे पासपोर्ट संयुक्तपणे तिसऱ्या क्रमांकावर आहेत. तर युनायटेड किंगडम, बेल्जियम, डेन्मार्क, न्यूझीलंड, नॉर्वे, स्विझर्लंड चौथ्या क्रमांकावर आहेत. युकेचा व्हिजा फ्री डेस्टिनेशन स्कोअर 190 पर्यंत घसरला आहे. दुसरीकडे अमेरिका आता आठव्या क्रमांकावर आला आहे. अमेरिकेतील नागरिक जगातील 186 देशांत व्हिजा फ्री प्रवास करू शकतात.
संयुक्त अरब अमिरात (युएई) या देशाने सन 2006 मध्ये हेनले पासपोर्ट इंडेक्सच्या स्थापनेनंतर पहिल्यांदाच 152 डेस्टिनेशनसह पहिल्या दहा देशांत स्थान मिळवले आहे. सद्यस्थितीत 185 व्हिजा फ्री डेस्टिनेशन स्कोअर मिळवण्यात या देशाला यश आले आहे.भारतीय पासपोर्टचा विचार केला तर भारतीय पासपोर्टधारक आता जगातील 58 देशांत व्हिजा फ्री एन्ट्री घेऊ शकतात. या देशांत फिरण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या व्हिजाची गरज भारतीयांना नाही.
या देशांमध्ये अंगोला, बार्बाडोस, भूतान, बोलिव्हिया, ब्रिटीश व्हर्जिन आयलँड्स, बुरुंडी, कंबोडिया, केप वर्डे बेट, कोमोरो बेटे, कूक आयलँड्स, जिबूती, डोमिनिका, इथिओपिया, फिजी, ग्रेनाडा, गिनी बिसाऊ, हैती, इंडोनेशिया, ईरान, जमैका, जॉर्डन, कझाकस्तान, केनिया, किरिबाती, लाओस, मकाओ, मेडागास्कर, मलेशिया, मालदीव, मार्शल आयलँड्स, मॉरटानिया, मॉरिशस, माइक्रोनेशिया, मोन्सेरात, मोझाम्बिक, म्यानमार, नेपाळ, नीयू, पलाऊ बेट, कतर, रवांडा, समोआ, सेनेगल, सेशेल्स, सिएरा लिओन, सोमालिया, श्रीलंका, सेंट किट्स अँड नेविस, सेंट लुसिया, सेंट विन्सेंट ग्रेनाडाइंस, टांझानिया, थायलँड, टिमोर लेस्ते, त्रिनिदाद टोबॅगो, ट्यूनिशिया, तुवालू, वानुअतु आणि झिम्बाब्वे या देशांचा समावेश आहे.
असे असले तरी प्रत्येक देशाचे व्हिजाचे नियम वेगवेगळे असतात. त्यामुळे या देशांत जाण्याआधी संबंधित देशांच्या दूतावासाच्या वेबसाइटवरून आवश्यक माहिती घेणे फायद्याचे ठरेल.
हेही वाचा :
शिवसेना ठाकरे गटाची ताकद वाढणार; ठाकरे गटाच्या ‘या’ दिग्गज नेत्याची पुन्हा घरवापसी
‘लाडकी बहीण’ अडचणीत; सरकारच्या तिजोरीवर येणार ४६००० कोटींचा बोजा
आरारारा… खतरनाक! ‘या’ पेनी स्टॉकने पाडलाय पैशांचा पाऊस