कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती(villages) निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील सर्व नद्यांचं पाणी पात्राबाहेर पडलं असून पंचगंगा नदीने धोका पातळी ओलांडली आहे. सध्या पंचगंगा नदीची पाणी पातळी ४४ फूट इतकी आहे, ज्यामुळे पंचगंगा नदी धोक्याच्या पातळीवरून वाहत आहे. या स्थितीला “मच्छिंद्र झाली” असे म्हणतात, म्हणजेच पंचगंगेच्या महापुराची उच्चतम पातळी मोजण्याची स्थिती आहे.
पंचगंगा नदीवर १८७८ साली बांधण्यात आलेला(villages) शिवाजी पूल आहे, ज्याला ५ दगडी कमानी आहेत. या पुलाला माशाच्या शरीरासारखा निमुळता आकार आहे. पुलाच्या या दगडावरून पंचगंगेच्या पुराचे पाणी वाहू लागले की “मच्छिंद्र झाली” असे समजतात. पूर्वीच्या काळात मोबाईल नसताना या संकल्पनेद्वारे कोल्हापुरात पूर आल्याचे संकेत दिले जात होते.
मुसळधार पावसामुळे शिरोळ तालुक्यात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. खिद्रापूर, राजापूर, राजापूर वाडी गावातील नागरिकांनी कुटुंबासह जनावरे स्थलांतरित करण्यास सुरुवात केली आहे. दरवर्षी शिरोळ तालुक्याला पुराचा मोठा फटका बसतो आणि यावेळी देखील पूराचा फटका बसण्याची शक्यता आहे. पावसामुळे पट्टणकोडोलीतील घरांची पडझड झाली असून ९५ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. ११ राज्य, ३७ प्रमुख जिल्हा मार्ग पूरामुळे बंद झाले आहेत, ज्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.
पुरग्रस्तांच्या बाबत सरकारच्या गांभीर्याचा अभाव असल्याचा आरोप आमदार सतेज पाटील यांनी केला आहे. त्यांनी सरकारवर टीका करताना सांगितले की, पूर नियोजनाची बैठक प्रशासनाने घेतली, परंतु अद्याप पूरग्रस्तांना मदत मिळालेली नाही. केंद्र सरकारने महाराष्ट्राला सापत्न वागणूक दिल्याचा आरोपही त्यांनी केला आणि एनडीआरएफच्या निकषांनुसार मदत देण्याची मागणी केली आहे. काँग्रेसच्या सर्व आमदारांनी पूरग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर सरकारवर टीका केली आहे.
हेही वाचा :
दीपिका पादुकोन आई झाल्यानंतर बाळासाठी घेणार मोठा निर्णय
रोहित शर्मा – हार्दिक पांड्या कॅप्टन्सी वादावर अखेर Jasprit Bumrahने मौन सोडले
कांदा-टोमॅटोनंतर आता बटाटा तेजीत, दरावर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारचा मोठा प्लॅन