अभिनेता अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा यांच्या ब्रेकअपच्या चर्चा गेल्या अनेक(breakup) दिवसांपासून सुरू होत्या. या चर्चांच्या दरम्यान दोघांनी सोशल मीडियावर अप्रत्यक्षपणे एकमेकांसाठी पोस्ट लिहिल्या होत्या, पण त्यांनी यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. मात्र, आता पहिल्यांदाच अर्जुन आणि मलायका हे एका सार्वजनिक कार्यक्रमात एकत्र दिसले आहेत.
अर्जुन आणि मलायका ‘इंडिया काऊचर वीक 2024’ या कार्यक्रमाला नवी दिल्लीत(breakup) हजेरी लावली होती. शुक्रवारी पार पडलेल्या या कार्यक्रमात, सर्वात आधी हे दोघे एकमेकांपासून दूर बसलेले दिसले. मात्र, एका व्हिडिओमध्ये अर्जुनने गर्दीतून मलायकाला वाट करून दिल्याचं पहायला मिळालं. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे आणि चाहत्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत.
पहिल्या व्हिडीओमध्ये मलायका आणि अर्जुन हे दोघे पहिल्या रांगेत बसलेले दिसत आहेत. मात्र, हे दोघे एकमेकांच्या बाजूला नव्हे, तर दूर बसले होते. दुसऱ्या व्हिडीओमध्ये अर्जुनभोवती चाहत्यांचा घोळका पाहायला मिळतो, आणि मलायका गर्दीतून पुढे जाण्यासाठी अर्जुन तिला वाट मोकळी करून देतो.
या कार्यक्रमात मलायकाने पांढऱ्या रंगाचा ब्लेझर को-ऑर्ड सेट परिधान केला होता, तर अर्जुनने ब्लॅक सिक्वीन शेरवानी आणि धोती सेट घातला होता. मलायका आणि अभिनेता राहुल खन्ना या फॅशन शोमध्ये डिझायनर सिद्धार्थ टिटलरसाठी शो स्टॉपर ठरले होते.
मे महिन्यापासून अर्जुन आणि मलायकाच्या ब्रेकअपच्या चर्चांना उधाण आले होते. हे दोघे 2018 पासून एकमेकांना डेट करत होते आणि सोशल मीडियावर त्यांच्या प्रेमाची जाहीर कबुली दिली होती. त्यानंतर दोघांना विविध ठिकाणी एकत्र पाहिलं गेलं आणि त्यांच्या लग्नाच्याही चर्चा होत्या. मलायकाने याआधी सलमान खानचा भाऊ अरबाज खानशी लग्न केलं होतं, 2017 मध्ये या दोघांनी घटस्फोट घेतला. त्यांना 21 वर्षांचा अरहान हा मुलगा आहे. या नव्या घटनाक्रमामुळे अर्जुन आणि मलायकाच्या नात्याबद्दलच्या चर्चांना पुन्हा एकदा नवीन वळण मिळालं आहे.
हेही वाचा :
ॲपलची ग्राहकांना मोठी भेट! iPhoneच्या किमती केल्या कमी
ऑगस्ट महिन्यात तब्बल 14 दिवस बँका राहणार बंद, जाणून घ्या सुट्ट्यांची संपूर्ण यादी!
हार्दिक-नताशाच्या नात्यात नवा ट्विस्ट! घटस्फोटानंतर ‘या’ गोष्टीमुळे सुरु झाला वाद?