थकवा अन् अशक्तपणा दूर करण्यासाठी ‘या’ पदार्थांचा करावा आहारात समावेश

जेव्हा शरीराला पोषक घटक मिळत नाही तेव्हा शरीराला थकवा किंवा अशक्तपणा(weakness) जाणवतो. दिवसभर काम करूनही भूक न लागणे किंवा पुरेशी झोप न घेतल्याने शरीराला थकवा जाणवतो. आहार तज्ज्ञांच्या मते शरीराचा अशक्तपणा किंवा थकवा दूर करायचा असेल तर पुढी पदार्थांचा आहारात समावेश करणे गरजेचे आहे. जर तुम्हाला थकवा आणि अशक्तपणाला सामोरे जावे लागत असेल तर आहारात बदल करावा.

बीट
शरीराचा थकवा आणि अशक्तपणा(weakness) दूर करण्यासाठी बीटचा आहारात समावेश करावा. यामध्ये अनेक पोषक घटक असतात जे शरीराचा थकवा दूर करतात. शरीरात रक्ताच्या कमतकतेमुळे थकवा आणि अशक्तपणा जाणवतो. बीटचा रस किंवा सॅलडमध्ये टाकून सेवन करू शकता.

दालचिनीचे पाणी
शरीराचा अशक्तपणा आणि थकवा दूर करण्यासाठी दालचिनाचा वापर करू शकता. यासाठी सकाळी दालचिनीचा एक छोटा तुकडा पाण्यात उकळून प्यावा.तसेच तुम्ही दालतिनीची पावजर देखील वापरू शकता.

लिंबू पाणी
लिंबूमध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात असते. शरीराचा थकवा आणि अशक्तपणा कमी करण्यासाठी लिंबूपाणी फायदेशीर ठरते. यासाठी एक ग्लास पाण्यात लिंबू टाकावे, थोडे मीठ टाकावे आणि त्याचे सेवन करावे. यामुळे दिवसभर तुम्हाला ऊर्जावान वाटेल.

चीया सीड्स
आहारात चिया बियांचा समावेश केल्याने शरीराचा थकवा आणि अशक्तपणा कमी होतो. यासाठी चिया सीड्स पाण्यात मिक्स करून सेवन करू शकता. हे पाणी प्यायल्याने दिवसभर थकवा जाणवणार नाही. तसेच पचनसंस्था सुरळित कार्य करते.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

हेही वाचा :

‘अलमट्टी’ची आगळीक कोल्हापूर-सांगलीच्या मुळावर!

‘बिग बॉस मराठी’चे नवे पर्व आजपासून: मनोरंजनाचा नवा पर्व सुरू

आज राज्यात पाऊस: हवामान विभागाचा अंदाज सविस्तर