अजितदादांचा आणखी एक आमदार फुटणार? शरद पवारांची कोण करतंय मनधरणी?

अजित पवार यांच्या भाजपसोबत हातमिळवणी केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात(mla example) उभी फूट पडली होती. अजित पवार यांच्यासोबत अनेक आमदार महायुती सरकारमध्ये सहभागी झाले होते, परंतु त्यानंतर शरद पवार यांनी नव्याने पक्षाची उभारणी केली आणि तुतारी चिन्हावर लोकसभेची निवडणूक लढवून ८ खासदार निवडून आणले. आता अजित पवार यांच्यासोबत गेलेल्या आमदारांना परतीचे वेध लागले आहेत.

अजित पवार गटाचे माजी आमदार बाबाजानी दुराणी यांनी नुकतेच शरद पवार(mla example) गटात प्रवेश केला, ज्यामुळे अजित पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या या प्रवेश सोहळ्यानंतर अजित पवार गटाच्या आणखी एका आमदाराने थेट शरद पवार यांच्या पुणे येथील कार्यक्रमाला हजेरी लावली आहे.

सातारा जिल्हा मित्र मंडळाच्या वतीने पुण्यात आयोजित गोल्डन ज्युबली कार्यक्रमात शरद पवार आणि अजित पवार पक्षाचे आमदार चेतन तुपे एकाच व्यासपीठावर दिसले. तुपे हे पुण्यातील हडपसरचे आमदार असून, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडल्यानंतर त्यांनी अजित पवार यांच्यासोबत जाणे पसंत केले होते.

कार्यक्रमानंतर आमदार तुपे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली की, हा कार्यक्रम राजकीय नव्हता आणि प्रोटोकॉलनुसार मी या कार्यक्रमात उपस्थित होतो. शरद पवारांसोबत कोणतीही चर्चा झाली नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. तुपे यांनी शरद पवार यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला, मात्र पवारांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. या घटनाक्रमामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे आणि अजित पवार गटात असलेले असंतोष पुढे येत असल्याचे दिसत आहे.

हेही वाचा :

हिंदीनंतर आता बिग बॉस मराठीच्या घरात एन्ट्री करणार ‘ही’ बोल्ड अभिनेत्री?

५४ तासानंतर कोल्हापूर-गारगोटी राज्यमार्ग वाहतुकीसाठी खुला

‘…अन्यथा आम्ही महाविकास आघाडीतून बाहेर पडणार’; विधानसभा निवडणुकीपूर्वी ‘या’ मोठ्या पक्षाने दिला इशारा