…फेसबुक खरेदी करणार ‘ही’ कंपनी; मार्क झुकरबर्ग उतरणार ‘या’ उद्योगामध्ये!

फेसबुक ही आघाडीची कंपनी लवकरच(industry) चष्मा निर्मिती कंपनी ‘एस्सिलोर लक्सोटिका’चा मोठा हिस्सा खरेदी करणार आहे. एस्सिलोर लक्सोटिका ही कंपनी आपल्या ‘रे बॅन’ ब्रँड नावाने चष्मा निर्मिती करते. त्यामुळे आता या दोन कंपन्यांमध्ये खरेदी करार झाल्यास मेटा ही कंपनी स्मार्ट ग्लास निर्मिती क्षेत्रात पदार्पण करणार आहे. ‘एस्सिलोर लक्सोटिका’चे मुख्य कार्यकारी अधिकारी फ्रांसेस्को मिलेरी यांनी मेटाचे मालक मार्क झुकरबर्ग यांच्यासोबत चाललेल्या अनेक चर्च्यांच्या फेऱ्यांनंतर उघडपणाने याबाबत प्रथमच माहिती दिली आहे.

याबाबतची माहिती समोर(industry) येताच शुक्रवारी (ता.२८) पॅरिसमध्ये एस्सिलोर लक्सोटिका या कंपनीच्या शेअरमध्ये 8.1 टक्के इतकी तेजी दिसून आली आहे. जी कंपनीच्या शेअरमधील मागील दोन वर्षातील सर्वात मोठी वाढ आहे. दोन्ही कंपन्या गेल्या काही वर्षांपासून एकत्रितपणे काम करत आहे. २०२१ मध्ये दोन्ही कंपन्यांच्या भागीदारी व्यवसायाअंतर्गत पहिला रे बॅन ग्लास अर्थात चष्मा बनवण्यात आला होता. त्यामुळे आता दोन्ही कंपन्यांमध्ये खरेदी करार झाल्यास, दोन्ही कंपन्यांच्या बाजार वृद्धीला मोठी मदत होणार आहे.

‘एस्सिलोर लक्सोटिका’चे मुख्य कार्यकारी अधिकारी फ्रांसेस्को मिलेरी यांनी म्हटले आहे की, “आम्हाला गर्व आहे की जी कंपनी आम्हाला अनेक वर्षांपासून ओळखत आहे. तीच कंपनी एस्सिलोर लक्सोटिकाचा हिस्सा खरेदी करणार आहे. ज्यामुळे आता कंपनीला भविष्यात वाढीसह प्रगतीची आशा आहे.”

ब्लूमबर्गने देखील चालू महिन्याच्या सुरुवातीला फेसबुककडून एस्सिलोर लक्सोटिका या कंपनीचा काही हिस्सा खरेदी केला जाऊ शकतो. असे म्हटले होते. त्यानंतर आता एस्सिलोर लक्सोटिका’चे मुख्य कार्यकारी अधिकारी फ्रांसेस्को मिलेरी यांनी यावर शिक्कामोर्तब केले आहे. दरम्यान मेटाकडून एस्सिलोर लक्सोटिकाचे नेमके किती भागभांडवल खरेदी केले जाणार आहे. याशिवाय हा खरेदी करार नेमका कधी होणार आहे. याबाबत कोणतीही माहिती समोर येऊ शकलेली नाही.

हेही वाचा :

राजकारणातून होते आहे भाषा सभ्यता तडीपार!

हिंदीनंतर आता बिग बॉस मराठीच्या घरात एन्ट्री करणार ‘ही’ बोल्ड अभिनेत्री?

थोडक्यात वाचला टीम इंडियाच्या खेळाडूचा डोळा! रक्तबंबाळ प्लेयरला पाहून गौतम झाला ‘गंभीर’ Video