कोल्हापुरातील चक्क पोलीस मुख्यालयातून पोलिसांची दुचाकी लंपास

कोल्हापुरासह जिल्हाभर वाहन चोरीच्या घटनांमध्ये वाढ(police) होत असून चोरांचे धाडस दिवसेंदिवस वाढत आहे. चोरट्यांनी आता थेट पोलीस मुख्यालयातील वाहनांवरही हात साफ करण्याचे धाडस केले आहे. कोल्हापूर पोलीस मुख्यालयातून एका पोलीस कर्मचार्‍याची दुचाकी चोरीला गेली आहे, ज्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. कोंस्टेबल सुभाष गवळी यांची ही दुचाकी भर दुपारी चोरट्यांनी लंपास केली असून या घटनेची नोंद शाहूपुरी पोलिसांत झाली आहे.

जालना पोलिसांनी (police)अंबड शहरात चोरी केलेल्या १३ मोटरसायकली जप्त केल्या आहेत. पोलिसांनी आरोपीला पकडल्यानंतर चोरीच्या दुचाकी आढळून आल्या. पोलिसांनी या प्रकरणी एक जणाला अटक केली असून अन्य आरोपी असल्याचा संशय आहे. दोन दिवसांपूर्वी जालना पोलिसांनी १६ मोटरसायकली जप्त केल्या होत्या.

वर्ध्याच्या आर्वी पोलिसांनी २३ दुचाकीसह चोरी करणारी टोळी जेरबंद केली होती. आर्वी पोलीस स्टेशन हद्दीतील दोन दुचाकी चोरीच्या तपासात धानोडी येथे विक्री करण्यासाठी आलेल्या युवकाला पकडण्यात आले. संशयित आरोपी नयन गायकवाड याला अटक केली असून त्याने वर्धा जिल्ह्यातील विविध ठिकाणांहून दुचाकी चोरल्याची कबुली दिली आहे.

या घटनांमुळे वाहन चोरीचे गुन्हे रोखण्यासाठी पोलिसांनी चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यास सुरुवात केली आहे. परंतु, वाहन मालकांनी देखील सतर्क राहण्याची आवश्यकता आहे.

हेही वाचा :

‘सार्वजनिक गणेशोत्सव आता बंद व्हायला हवेत’, अभिनेत्रीचं स्पष्ट मत

…फेसबुक खरेदी करणार ‘ही’ कंपनी; मार्क झुकरबर्ग उतरणार ‘या’ उद्योगामध्ये!

कोण आहे अक्षय कुमारच्या मुलासोबत दिसलेली ही मुलगी? बॉलीवूड अभिनेत्रींनाही देईल टक्कर