महायुतीत फूट! माजी आमदार नितीन पाटील शिंदे गटातून अजित पवार गटात

महाराष्ट्राच्या राजकारणात (politics)मोठा उलथापालथ होत असून, शिंदे गटातील माजी आमदार नितीन पाटील यांनी अजित पवार गटात प्रवेश केला आहे. या निर्णयामुळे महायुतीत खळबळ माजली आहे आणि आगामी विधानसभेत लढत कशी राहणार याबाबत प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे.

नितीन पाटील यांनी त्यांच्या निर्णयाबाबत स्पष्टता करताना सांगितलं की, “अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राज्याच्या विकासासाठी काम करण्याची संधी मिळेल, असा विश्वास आहे.” पाटील यांच्या या निर्णयामुळे शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे.

महायुतीतील पळवापळवीमुळे विधानसभेत येणाऱ्या काळात कशी लढत होईल, याबाबत राजकीय विश्लेषक विचारमंथन करत आहेत. एकीकडे महाविकास आघाडीला फायदा होईल, तर दुसरीकडे महायुतीला याचा तोटा होऊ शकतो.

राजकीय समीकरणं आणि महायुतीतील अस्वस्थता यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुढील काही दिवसांत मोठे बदल होण्याची शक्यता आहे. विधानसभेत कोणती रणनीती आखली जाईल आणि कोणती नवी आघाडी निर्माण होईल, हे पाहणं रंजक ठरणार आहे.

हेही वाचा :

बाथरोब घालून श्वेता तिवारीच हॉट फोटोशूट…

मनोज जरांगे पाटील विधानसभा निवडणुकीसाठी शड्डू ठोकणार?

देश आज कमळाच्या चक्रव्ह्युव्हात अडकला आहे; राहुल गांधींनी तोफ डागली