समित कदम या नावाने महाराष्ट्राच्या राजकारणात (politics) खळबळ उडाली आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आरोप केला आहे की, ठाकरे पिता-पुत्र आणि अजित पवारांना अडकवण्यासाठी फडणवीसांमार्फत जो माणूस त्यांच्या कडे आला होता, तो समित कदमच आहे. सह्यांसाठी खोटी प्रतिज्ञापत्रे घेऊन आलेल्या समित कदम यांनी देशमुखांकडे संपर्क साधला होता. देशमुखांनी फडणवीस आणि समित कदम यांच्या फोटोंसह हे आरोप सार्वजनिक केले आहेत.
महाविकास आघाडी सरकारमध्ये (politics) अनिल देशमुख गृहमंत्री होते. मिरजचे रहिवासी समित कदम यांची देशमुखांना नेमकी काय मदत लागली होती, याबाबत समित कदम स्पष्ट बोलण्यास टाळाटाळ करत आहेत. त्यांनी हा फडणवीसांच्या बदनामीचा डाव असल्याचा आरोप करत देशमुखांना वेड लागल्याची टीका केली आहे.
पाच दिवसांपूर्वी, अंनिसचे श्याम मानव यांनी फडणवीसांवर आरोप करताना, चार प्रतिज्ञापत्रे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुखांकडे पाठवण्यात आल्याचा आरोप केला होता. श्याम मानव यांच्या मते, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, आणि अजित पवारांना जेलमध्ये टाकण्याचा फडणवीसांचा डाव होता. आता अनिल देशमुख म्हणतात की, तो फडणवीसांचा माणूस म्हणजेच समित कदम आहे.
समित कदम कोण आहेत? समित कदम मूळचे मिरजचे असून, जनसुराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत. सप्टेंबर 2019 मध्ये युती सरकारमध्ये (politics) भाजपने समित कदम यांना वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्षपद दिले होते. आता याच समित कदमांना फडणवीसांनी Y दर्जाची सुरक्षा का दिली? असा प्रश्न संजय राऊतांनी उपस्थित केला आहे.
हेही वाचा :
पावसाच्या पाण्याने अंघोळ केल्यामुळे होतात ५ आश्चर्यकारक फायदे, एकदा जरूर वाचा
काँग्रेसच्या माजी मंत्र्यांच्या घरासमोर शेतकऱ्यांचा ‘घेराव’, कर्जमाफीची मागणी जोरदार
तलाठी आणि तहसीलदाराच्या कथित छळाने ग्रासलेल्या तरुणाने आत्महत्या केली, व्हिडिओ संदेशात आरोप